शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
7
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
8
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
9
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
10
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
11
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
12
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
13
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
14
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
15
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
16
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
17
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
18
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
19
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
20
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान

मानवता हेच सर्व धर्मांचे मूलतत्त्व

By admin | Updated: December 25, 2015 00:02 IST

हम सब एक हैं : सर्वधर्म भाईचारा सभेच्या व्यासपीठावरून अभ्यासकांचा उद्घोष

सातारा : जगाच्या पाठीवर अनेक धर्म असले, तरी प्रत्येक धर्माचे मूलतत्त्व मानवता हेच आहे. दार्शनिकांनी समता आणि प्रेमाचाच संदेश दिला आहे. त्यामुळे धर्माच्या आधारावर एकमेकांचा द्वेष करणे गैर आहे, असा संदेश सर्व धर्मांच्या अभ्यासकांनी एका व्यासपीठावरून दिला. पैगंबर जयंती, दत्तजयंती आणि नाताळाच्या पार्श्वभूमीवर सर्वच धर्मांच्या प्रणेत्यांचे विचार एकाच व्यासपीठावरून ऐकण्याची दुर्मिळ संधी मिळवून दिली ती मुस्लिम जागृती अभियान आणि परिवर्तनवादी संघटनांच्या समन्वय समितीने. सर्व धर्मांचे उत्सव एकत्र, शिवाय साने गुरुजींची जयंती असा योगायोग साधून सर्वधर्म भाईचारा सभेचे आयोजन येथील गांधी मैदानावर करण्यात आले होते. ज्येष्ठ विचारवंत डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत वारकरी संप्रदाय, जैन, बौद्ध धम्म, मुस्लिम अशा सर्वच धर्मांचे मूळ विचार मांडण्याचा प्रयत्न अभ्यासक वक्त्यांनी केला. जैन तत्त्वज्ञानाचे अभ्यासक विजयकुमार जोखे म्हणाले, ‘प्राण्यांचे हवन करणारी यज्ञसंस्कृती संस्कृती नाकारून महावीरांनी अहिंसा स्वीकारली. विषमता हेच दु:खाचे मूळ असल्याचे सांगून सर्व प्राण्यांचा जगण्याचा हक्क मानला. अंधश्रद्धांना विरोध केला. अनेकान्तवादाची मांडणी करून विचारस्वातंत्र्याचा पुरस्कार केला. अर्धमागधी या लोकभाषेत विचार मांडून भाषिक क्रांती केली.’संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. सुहास फडतरे यांनी वारकरी संप्रदाय चार पंथांचा मिळून तयार झाल्याचे सांगितले.‘एकेश्वरवादामुळे अंधश्रद्धा निर्माण होत नसल्याने वारकऱ्यांनीही तो स्वीकारला. हा एकेश्वरवाद आणि स्त्रीस्वातंत्र्याचे तत्त्व पैगंबरांकडून स्वीकारले आहे,’ असे सांगतानाच त्यांनी धर्मप्रसारक म्हणून पत्नीची नेमणूक करणाऱ्या पैगंबरांचे विचार विषद केले.बसवेश्वरांनी सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या क्रांतीचे विवेचन गुरुमाता नंदाताईंनी केले. ‘कुराण आणि उपनिषदांमध्येही परमात्मा एकच असून, तो निर्गुण-निराकार असल्याचे सांगितले आहे,’ असे त्या म्हणाल्या.शाही मशिदीचे इमाम हाफिज खलील अहमद, बौद्ध धम्माचे अभ्यासक प्रा. हर्ष जगझाप, प्राचार्या मयूरा गायकवाड यांनीही दार्शनिकांचे विचार व्यवहारात आणण्याची गरज प्रतिपादन केली. विजय मांडके यांनी सूत्रसंचालन केले. सभेला सर्वधर्मीय श्रोत्यांनी गर्दी केली होती. (प्रतिनिधी)चिमणी आणि माकडाची गोष्ट...समाजात माणसाने कशासाठी आणि कसे जगायचे हे स्पष्ट करताना गुरुमाता नंदाताई यांनी चिमणी आणि माकडाची गोष्ट सांगितली. झोपडपट्टीतील लोकांनी या दोघांचा सांभाळ केला होता. एकदा झोपडपट्टीला आग लागली आणि चिमणी तिला प्यायला ठेवलेले पाणी चोचीतून आगीवर शिंपडू लागली. माकडाने तिची टर उडवली आणि ‘एवढ्याशा पाण्याने आग विझणार का,’ असा सवाल केला. तेव्हा चिमणी म्हणाली, ‘जेव्हा संपूर्ण झोपड्या जळून खाक होतील, त्यानंतर दोन प्रश्न विचारले जातील. आग कोणी लावली? आणि आग कोणी विझविली? मी दुसऱ्या वर्गात राहू इच्छिते म्हणून चोचीने पाणी शिंपडत आहे.’ हे उदाहरण श्रोत्यांना अंतर्मुख करणारे ठरले.