शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवार शोधताना लागणार कस!

By admin | Updated: January 9, 2017 22:31 IST

माण तालुका : खुले आरक्षण असतानाही अनेकजणांची गटावर नजर

नवनाथ जगदाळे ल्ल दहिवडीगोंदवले जिल्हा परिषद गटामध्ये खुल्या प्रवर्गातील महिला आरक्षण असून, उमेदवार निवडताना नेत्यांचा कस लागणार आहे. या गटात गोंदवलेसह पळशी हे गाव मोठे असल्याने गोंदवले किंवा पळशी मधीलच जिल्हा परिषदेसाठी उमेदवार राहत असतो. या गटात ओबीसी समाज अधिक असून, आरक्षण खुले असले तरी अनेकांच्या नजरा या गटावर राहणार आहेत.माण तालुक्यातील या गटात मागील निवडणुकीत यशवंतराव माने महाराज यांचे सुपुत्र बाळासाहेब माने यांचा अनिल देसाई यांनी पराभव केला होता. त्यामुळे देसाई हे कुकुडवाड गटात राष्ट्रवादीने तिकीट न दिल्यास व पक्षाने आग्रह केल्यास गोंदवले गटात कुटुंबातील एखाद्या महिलेला उतरवू शकतात. मात्र, प्रत्येक वेळीच बाहेरील उमेदवाराला गट स्वीकारेलच असे नाही. तरीही इच्छुक पुढे येत नसल्याने देसाई यांना लॉटरी लागू शकते. राष्ट्रवादीतून पूर्वी लोधवडे येथील छायादेवी चोपडे यांनी या गटाचे नेतृत्व केले आहे. कॉँग्रेसमधून गोंदवले खुर्दचे अजित पोळ यांच्या घरातूनच उमेदवारी दिली जाईल, अशीही चर्चा आहे. मतदारसंघात अनुभवी व ज्येष्ठ नेते बाळासाहेब माने, गोंदवलेचे माजी सरपंच विष्णुपंत कट्टे, अंगराज कट्टे अशी अनेक नावे ऐनवेळी आपला दावा करू शकतात. बाळासाहेब खाडे व डॉ. राजेंद्र खाडे हे पळशीचे असल्याने भाजपची ताकद गटात आहे. विशेषत: वंजारी समाजाची ताकद या गटात नेहमी निर्णायक ठरली आहे. भाजपमधून गोंदवलेचे अरुण कट्टे हे आपल्या पत्नीसाठी इच्छुक असून, दहिवडीच्या माजी सरपंच अर्चना महाडिक यांचेही माहेर गोंदवले असल्याने पक्षाने तिकीट दिल्यास त्या उमेदवारी करण्यास इच्छुक असल्याचे समजते. दहिवडी नगरपंचायतीला संधी असतानाही त्यांनी उमेदवारी न लढवणे पसंत केले होते. वेळ प्रसंगी धामणीचे सरपंच सदाशिव खाडे यांच्या पत्नीही उमेदवारी करू शकतात.