शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

चक्क घरचं अंगण घेतलं भाडेकरारावर!

By admin | Updated: May 26, 2015 00:54 IST

वृध्द जोडप्याचं हाल : पोलीसदादा म्हणतो, ‘तुम्हाला कोणी सांगितलं फसायला’

सातारा : भाकरीच्या अर्ध्या चंद्रासाठी महानगरांत गेलेल्या मुलांच्या संसाराला हातभार लागावा म्हणून घरचं आंगण पवनचक्की कंपनीला भाडे करारावर देणाऱ्या चंद्रू गालवे यांच्यावर आता उपासमारीची वेळ आली आहे. तीन लाखांची बोली ठरवून दीड वर्षात केवळ पन्नास हजार रुपये देऊन त्यांची बोळवण करणाऱ्या कंपनी कर्मचाऱ्यांना पोलिसांचीही साथ मिळत असल्याचे खेदजनक वास्तव पुढे आले आहे. गोकुळ तर्फ पाटण येथील चंद्रू गालवे यांना तीन मुले. त्यांची ही तिन्ही मुलं रोजगाराच्या निमित्ताने महानगरांत स्थायिक आहेत. सत्तरी ओलांडलेल्या गालवे यांना दोन वर्षांपूर्वी पवनचक्की कंपनीतून काही माणसं भेटायला आली. प्राथमिक बोलणी झाल्यानंतर अंतिम चर्चेसाठी मुलगा येणार असल्याचे सांगून ती बैठकही झाली. बैठकीत ठरल्याप्रमाणे गालवे यांना दीड वर्षांपूर्वी कंपनीने पन्नास हजार रुपये रोख दिले. त्यानंतर मात्र कंपनीने आज, उद्या करत वेळ घालविला. तब्बल दीड वर्षे हेलपाटे मारूनही गालवे यांना त्यांची निर्धारित रक्कम मिळाली नाही.मोरगिरी ते गोकुळ हा १२ किलोमीटरचा रस्ता आहे. यातील चार किलोमीटरची पायपीट करून गालवे पाटण स्टॅण्डला पोहोचतात. तेथून एक किलोमीटरवर कंपनीचे आॅफिस तेही पायीच जाणे. या हेलपाट्यांना वैतागून गालवे यांनी अखेर चढ्या आवाजात कंपनी कर्मचाऱ्यांना जाब विचारला. त्यानंतर ‘पुढील सप्ताहात येऊन चेक न्या,’ असे अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले. त्यानुसार त्यांना एप्रिल २०१५ चा चेक दिला. यातही कंपनीने चलाखी केली. ‘चेक हा सुरक्षेच्या कारणास्तव दिला आहे. तो खात्यात भरू नये,’ असा उल्लेख चेकच्या मागे करण्यात आला आहे. त्यामुळे या धनादेशाचा काहीच उपयोग नसल्याचे गालवे यांच्या लक्षात आले. गालवे यांनी पोलिसांत धाव घेतली तर तिथेही त्यांना धक्कादायक वागणूक मिळाली. आपल्याबाबतीत घडलेल्या गोष्टींची माहिती त्यांना दिल्यानंतर ‘तुम्हाला कोणी सांगितलं होतं फसायला’ अशी भाषा पोलिसांनी वापरली. ‘सद्रक्षणाय’ चे ब्रिद छातीवर बाळगणाऱ्या पोलिसांच्या या भूमिकेमुळे गालवे पुरते खचून गेले आहेत. (प्रतिनिधी)कोणाला सोबत आणायचं नाही.सत्तरी ओलांडलेल्या गालवे यांना संधीवाताचा त्रास आहे. घरापासून कंपनीच्या कार्यालयापर्यंत प्रवासात त्यांच्याबरोबर गावातील तरुण जायचे. कंपनीचे अधिकारी गोड बोलून गालवे यांना फसवू लागले की हे तरुण आक्रमकपणे आपले मत मांडायचे. हे कंपनी कर्मचाऱ्यांना मान्य नव्हते. म्हणून त्यांनी गालवे यांना ‘तुम्ही एकटे या, सोबत कोणाला आणले तर कार्यालयात घेणार नाही,’ अशी धमकीही दिली.‘आमच्या गावाकडं शिक्षण आणि नोकरी याची सोय नसल्यामुळे तिन्ही मुलं मुंबईत राहतात. त्यांच्या संसाराला हातभार लागावा आणि अंगणाच्या मोबदल्यात प्रत्येकाला लाख-लाख रुपये मिळावे, या हेतूने मी जागा भाडेकरारावर दिली. डोळे मिटेपर्यंत हे पैसे मिळणार नाहीत, असेच वाटू लागले आहे.’- चंद्रू गालवे, शेतकरी, गोकुळ तर्फ पाटण