शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण होणे हीच आदरांजली

By admin | Updated: November 2, 2014 23:32 IST

गारळे : सुवर्णकन्या नंदा जाधव यांच्या १५ व्या स्मृतिदिनी सत्तर जणांचे रक्तदान

सातारा : ‘प्रतिकूल परिस्थितीतून जिद्दीने वाटचाल करत सातारची आंतरराष्ट्रीय धावपटू व महाराष्ट्राची सुवर्णकन्या दिवंगत नंदा जाधव हिने यश संपादन केले होते. नंदा जाधव ही राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील धावण्याच्या स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करून देशाचे व सातारा जिल्ह्याचा नावलौकिक वाढविला होता. जिल्ह्यातून आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण होणे हीच खरी नंदा जाधव हिला आदरांजली ठरेल,’ असे उद्गार महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाचे अध्यक्ष टी. आर. गारळे यांनी काढले.आंतरराष्ट्रीय धावपटू व महाराष्ट्राची सुवर्णकन्या दिवंगत नंदा जाधव हिच्या १५ व्या स्मृतिदिनी नंदा जाधव स्मृती प्रतिष्ठानतर्फे आयोजित रक्तदान शिबिरात ते बोलत होते. यावेळी शिरीष कुलकर्णी, राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक पंच राजेंद्र कामटे, नंदा जाधव स्मृती प्रतिष्ठनचे अध्यक्ष शंकरराव जाधव, ज्येष्ठ क्रीडा संघटक सुरेश साधले, पंचायत समिती सदस्य आनंदराव कणसे उपस्थित होते.गारळे म्हणाले, ‘नंदा जाधवची खेळाप्रती असलेली चिकाटी व जिद्द पाहिली होती. कोणत्याही सोयी-सुविधा नसतानाही नंदाने अलौकिक यश संपादन केले होते. सातारा शहरात खेळांसाठी क्रीडा प्रबोधिनी उभारली जावी. हे नंदाचे अखेरचे स्वप्न होते. ते प्रत्यक्षात आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. पायात बूट नसताना, अंगावर ट्रॅकसूट नसताना केवळ साध्या कपड्यांवर नंदा दिवसदिवस सराव करत होती. तिच्या याच जिद्दीने तिने राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत यश संपादन केले. ती असती तर साताऱ्यातून अनेक खेळाडू तिने तयार केले असते.’कुलकर्णी म्हणाले, ‘कित्येक स्पर्धांना जाण्यासाठी लोकवर्गणी गोळा करून नंदा स्पर्धांना जात होती. नंदा जाधव स्मृती प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करून आदरांजली वाहण्यात येते हा उपक्रम खरोखचे स्तुत्य आहे.’ यावेळी ७० हून अधिक नागरिक व खेळाडूंनी रक्तदान केले. यावेळी राजेंद्र पवार व प्रदीप पालकर यांच्या सर्व कुटुंबीयांनी रक्तदान करून अनोख्यारीतीने नंदा जाधव यांना आदरांजली वाहिली. अशोकराव पवार, बी. आर. पाटील, डॉ. प्रशांत कापरे, डॉ. जयदीप चव्हाण, संजय जाधव, डॉ. प्रवीण जाधव, विजय पाटील, बाळासाहेब जाधव, प्रणव टंकसाळे, प्रा. राजेंद्र कुंभार, दिनकराव भोसले, मोहन यादव, मनोज जाधव उपस्थित होते. सुरेश साधले यांनी सूत्रसंचालन केले. अशोकराव पवार यांनी आभार मानले केले. (प्रतिनिधी)