मलकापूर : कोरोनाची गंभीर परिस्थिती असतानाही स्वच्छ सर्वेक्षण २०२१ साठी मलकापूरने कंबर कसली आहे. त्यासाठी शहरामध्ये 'हायटेक स्वच्छतागृह' बनविण्यात आले आहेत. सर्व सोयींनीयुक्त अशा स्वच्छतागृहांची सुविधा ठिकठिकाणी केली आहे. त्यामुळे नागरिक व प्रवाशांची मोठी सोय झाली आहे. यासह इतर स्वच्छतेत सातत्य ठेवून पालिकेने स्वच्छ सर्वेक्षणात पहिल्या पाचमध्ये येण्याचा निर्धार केला आहे.
स्वच्छ सर्वेक्षणाच्या अनुषंगाने पालिका स्वच्छतेबाबत विविध उपक्रम राबवत आहे. नागरिकांच्या सोयीसाठी पालिकेने नव्याने ११ मोड्युलर टॉयलेट बनवले आहेत. त्यापैकी पाच महिलांसाठी तर सहा टॉयलेट पुरुषांसाठी आहेत. ढेबेवाडीफाट्यावर कृष्णा रुग्णालयाच्या भिंतीलगत ४ आधुनिक स्वच्छतागृह बसविण्यात आले आहेत. त्यापैकी दोन महिलांसाठी तर दोन पुरुषांसाठी आहेत. याच परिसरात महामार्ग पोलीस मदत केंद्राशेजारी महिला व पुरुषांसाठी प्रत्येकी एकेक, अहिल्यानगर येथील नवीन भाजी मंडईमध्ये दोन पुरुष व एक महिलांसाठी असे तीन, तर आगाशिवनगर येथे इमर्सन कंपनीशेजारी दोन स्वच्छतागृहे उभारली आहेत.
पालिकेने शहरामध्ये डी मार्ट, अहिल्यानगर, लक्ष्मीनगर व आगाशिवनगर झोपडपट्टी या परिसरांमध्ये चार बेस्ट स्वच्छतागृहांची निर्मिती केली आहे. त्यामध्ये कमोड सुविधा तसेच अपंगांसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. हे बीओटी तत्त्वावर चालविण्यात येत असून त्यामधून पालिकेला उत्पन्न मिळत आहे. प्रतिव्यक्ती पाच रुपये याप्रमाणे दर ठेवला आहे. या स्वच्छतागृहांमध्ये सॅनिटरी नॅपकिन, पॅड, एटीएम, हॅण्ड ड्रायर, पाणी, लाइट, मशीन आधी सोयी केल्या आहेत. तसेच फीडबॅक मशीन बसवली आहे. या स्वच्छतागृहात १० लोक एका वेळेला जातील, अशी व्यवस्था केली आहे. या व्यतिरिक्त शहरामध्ये ११ मॉड्युलर व लहान मुलांसाठी दोन 'बेबी टॉयलेट' बनवण्यात आले आहेत. ही शौचालये थोड्याच दिवसांत खुली होणार आहेत.
चौकट
शहरात १८ ठिकाणी स्वच्छतागृहे
शहरातील १८ ठिकाणी स्वच्छतागृहे उभारली आहेत. यामध्ये बेस्ट स्वच्छतागृह ४, मोड्युलर स्वच्छतागृह ११, मोबाइल स्वच्छतागृह १, बेबी स्वच्छतागृह २.
चौकट
स्वच्छतागृहांमधील सुविधा
पुरेशा पाण्याची व्यवस्था
लाइटची व्यवस्था
वॉश बेसिन, पुरेसे व्हेंटिलेशन
स्टेनलेस स्टील बॉडीचे टॉयलेट
चौकट
सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या पाहुण्यांची सोय
शहरात बसवलेल्या स्वच्छतागृहामुळे ढेबेवाडी खोऱ्यांतून ये-जा करणाऱ्या प्रवाशांची, महामार्ग पोलीस, अहिल्यानगर येथील नवीन भाजी मंडई, आगाशिवनगर येथे इमर्सन कंपनीत व डी मार्टमध्ये येणाऱ्या नागरिकांची सोय झाली आहे.
फोटो
माणिक डोंगरे यांनी फोटो मेल केला आहे.
मलकापुरात स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत सर्व सोयींनीयुक्त अशा स्वच्छतागृहांची सुविधा ठिकठिकाणी केली आहे. (छाया : माणिक डोंगरे)