शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

शनैश्वर देवस्थानच्या मदतीमुळे लोककलावंताच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:45 IST

शनैश्वर देवस्थान मदतीमुळे लोककलांवत भारावला लोकमत न्यूज नेटवर्क पिंपोडे बुद्रुक : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीत ...

शनैश्वर देवस्थान मदतीमुळे लोककलांवत भारावला

लोकमत न्यूज नेटवर्क

पिंपोडे बुद्रुक : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीत आजवर उपजीविका करणारी कलाही फोल ठरली. त्यामुळे हतबल झालेल्या लोककलावंतावर भंगार गोळा करून जगण्याची वेळ आल्यानंतर श्रीशनैश्वर देवस्थानकडून मदत करण्यात आली. कलेच्या माध्यमातून लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणारा लोककलावंत देवस्थानच्या या मदतीने पुरता भारावून गेला.

सबंध मानवजातीवर ओढावलेला कोरोना विषाणू संसर्ग व त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. बहुतांशी लोकांचे उपजीविकेचे साधन बंद झाल्याने उपासमारीची वेळ आली. त्यामुळे मिळेल ते काम काम करून जगण्याची सर्वत्र धडपड सुरू आहे. कलेच्या माध्यमातून लोकांच्या मनाचा ठाव घेऊन त्यांचे मनोरंजन करणारा तमाशा व्यवसाय कोरोनामुळे धोक्यात आला आहे. याच कलेच्या माध्यमातून आपल्या कुटुंबीयांसह आणखी दहा ते बारा जणांच्या कुटुंबीयांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या रवींद्र पिंपळे यांच्यावर भंगार गोळा करण्याची वेळ आली. लोककलावंतावर आलेल्या या विदारक परिस्थितीची दखल घेत सोळशी येथील शनैश्वर देवस्थान ट्रस्टचे मठाधिपती प. पू. नंदगिरी महाराज यांनी त्यांना जीवनावश्यक वस्तूंसह रोख रक्कम स्वरूपात मदत केली.

दरम्यान, कोरोनामुळे अडचणीत आलेल्या लोककलावंताला मदत करत शनैश्वर देवस्थानने केलेल्या या कलेच्या व माणुसकीच्या आदराचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. त्यामुळे मदतीचे काही हात पुढे आले आहेत.

--------------------------------–--------------

सामाजिक प्रबोधनाचे अधिष्ठान म्हणून नावारूपास आलेले शनैश्वर देवस्थान नेहमीच अडचणीतील लोकांना मदत करते. कोरोनाकाळात देवस्थानाच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंसह आरोग्यविषयक बाबींची मदत करण्यात आली आहे. यापुढील काळातही देवस्थानच्या वतीने समाजोपयोगी कार्याला प्राधान्य दिले जाईल.

- प. पू. शिवयोगी नंदगिरी महाराज

मठाधिपती, शनैश्वर देवस्थान

----------------------------------------------

शनैश्वर देवस्थानकडून नेहमीच गरिबांसाठी मदत केली जाते. या काळात देवस्थानकडून मदत मिळाल्याने माझ्या व माझ्या कुटुंबीयांवरील उपासमारीची वेळ टळली आहे.

- रवींद्र पिंपळे, कलावंत

----------------------------------------------