शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यातील खड्ड्यांची भर पावसात मलमपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:25 IST

सातारा : सातारा शहरातील अंतर्गत रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. पालिकेकडून भर पावसात हे खड्डे खडी व मुरूम ...

सातारा : सातारा शहरातील अंतर्गत रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. पालिकेकडून भर पावसात हे खड्डे खडी व मुरूम टाकून मुजविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. उशिरा का होईना पालिकेने डागडुजीचे काम हाती घेतल्याने वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला.

सातारा शहर डोंगरउतारावर वसल्याने अतिवृष्टीचा शहरावर मोठा प्रभाव पडत नाही. मात्र, शहरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था होते. पावसाळा सुरू झाला की खड्ड्यांचा विषय हा नेहमीच चर्चेचा ठरतो. पालिकेने पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील प्रमुख रस्त्यांचे डांबरीकरण उरकून घेतले. मात्र, अंतर्गत रस्त्यांची अवस्था दयनीय झाली असून, याचा वाहनधारकांसह नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमधून वाट काढताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. शहरात ज्या भागात भुयारी गटार योजनेचे काम झाले आहे त्या भागातील रस्ते केवळ नावापुरतेच उरले आहे. पावसाळ्यापूर्वी पालिकेने काही ठिकाणचे रस्ते खडी टाकून मुजविले; परंतु मुसळधार परिस्थिती पुन्हा जैसे थे झाली. शहर व परिसरात गेल्या तीन-चार दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. या पावसातच पालिकेने खड्ड्यांच्या मलमपट्टीचे काम हाती घेतले आहे. वाहनधारकांना या कामामुळे दिलासा मिळाला असला तरी भर पावसात खड्डे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने वाहनधारकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे.

फोटो : ०८ जावेद खान ०२

सातारा नगरपालिकेकडून शहरातील अंतर्गत रस्त्यांवर पडलेले खड्डे खडी व मुरूम टाकून मुजविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. (छाया : जावेद खान)