शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल पंचावन्न टन कचरा उचलला

By admin | Updated: November 16, 2014 23:51 IST

महास्वच्छता अभियान : चार तासांत हजारो हात फिरले सातारा शहराच्या रस्त्यांवर

सातारा : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सुमारे २ हजार सदस्यांचे एकवटलेले चार हजार हात अन् त्यांना मिळालेली नगरपालिकेची भक्कम साथ या एकीतून सातारा शहरातून ४ तासांत तब्बल ५५ टन कचरा उचलण्यात आला. एकाच वेळी सातारा शहराच्या रस्त्यांवर हजारो झाडू फिरले अन् शहराचे रूपडे पालटून गेले.सातारा शहरात रविवारी सकाळी आठ वाजता महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. यामध्ये डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सुमारे २ हजार सदस्यांनी संपूर्ण सातारा शहरात स्वच्छता मोहीम राबविली. मोती चौकातून स्वच्छतेस प्रारंभ करण्यात आला. यामध्ये सुमारे १५० ट्रक कचरा गोळा करण्यात आला. नगरपालिकेने तो कचरा उचलून कचरा डपोत टाकला. ज्येष्ठ निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी हे या प्रतिष्ठानचे अध्यक्ष असून राज्यपालांनी त्यांची राज्याचे स्वच्छता दूत म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांच्या व सचिन धर्माधिकारी, उमेश धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण देशात एकाच वेळी ही मोहीम राबविण्यात आली. अभियानासाठी संपूर्ण जिल्ह्यातून श्री सदस्य जेवणाचे डबे, झाडू, घमेली, वाहने, मास्क, हातमोजे, पाण्याच्या बाटल्या घेऊन सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)सातारा शहरात रविवारी धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने ठिकठिकाणी महास्वच्छता मोहीम राबविण्यात आली.