शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टरमधून पडून मृत्यू झालेल्याची ओळख पटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:39 IST

सातारा : ट्रॅक्टरमधून पडून मृत्यू झालेल्या व्यक्तीची पोलिसांना ओळख पटली असून, संबंधित व्यक्ती बीड जिल्ह्यातील वैजनाथ परळीमधील असल्याचे समोर ...

सातारा : ट्रॅक्टरमधून पडून मृत्यू झालेल्या व्यक्तीची पोलिसांना ओळख पटली असून, संबंधित व्यक्ती बीड जिल्ह्यातील वैजनाथ परळीमधील असल्याचे समोर आले आहे. मात्र, संबंधित व्यक्तीच्या पत्नीने पतीचा घातपात झाल्याची शक्यता वर्तविल्याने खळबळ उडाली आहे.

सुनील दत्ता कांबळे (४०, सध्या रा. कुमठे फाटा, सातारा, मूळ रा. वैजनाथ परळी, बीड) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, सोमवारी रात्री साडेअकरा वाजता १०८ रुग्णवाहिकेने एका व्यक्तीला मृत अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, संबंधित रुग्णवाहिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्याचा अपघात नेमका कुठे झाला, हे सांगितले नव्हते. त्यामुळे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीची ओळख पटवणे पोलिसांना अवघड झाले होते. दरम्यान, मंगळवारी सकाळी अपघातात ठार झालेली व्यक्ती सुनील कांबळे असल्याचे त्यांच्या पत्नीने ओळखले. मात्र, त्यांचा अपघात झाला नसून कोणीतरी त्यांना मारले असल्याचे पत्नीचे म्हणणे आहे. यामुळे या प्रकरणाचे गूढ वाढले आहे. सुनील कांबळे हे शेतमजुरीच्या कामासाठी कोरेगावमध्ये आले होते. त्यांचा अपघात कोरेगाव तालुक्यातील कुमठे येथे झाल्यामुळे या अपघाताची नोंद कोरेगाव पोलीस ठाण्यात होणार असल्याचे जिल्हा रुग्णालयातील पोलिसांनी सांगितले.