शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
2
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
3
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
4
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
5
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
6
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
7
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
8
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
9
IND vs SA: पंतची विकेटमागून 'बोलंदाजी'! बावुमा कुलदीपच्या जाळ्यात अडकला! (VIDEO)
10
"निवडणूक आयोग आणि SIR जबाबदार...!"; बिहार निवडणूक निकालावरून काँग्रेस भडकली
11
Bihar Election Result: "...यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते"; संजय राऊतांचं निकालावर खळबळजनक विधान
12
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
13
बिहारमध्ये एनडीएला बंपर विजय कसा मिळाला? ही आहेत ५ प्रमुख कारणं
14
तेजस्वी पिछाडीवर, तिकडे तेज प्रताप यादवांची काय अवस्था...; 'हम तो डुबेंगे सनम...' खरे ठरतेय? 
15
कामगिरी दमदार; पीएम मोदींच्या हनुमानाची 'हनुमान उडी', LJP(R) इतक्या जागांवर आघाडीवर...
16
बिहार निवडणूक निकाल: राघोपुरात तेजस्वी यादव पिछाडीवर; लखीसरायमध्ये विजय सिन्हांची आघाडी कायम
17
बिहारमध्ये NDA ला आघाडी, भाजप-जेडीयूच्या जागा वाढल्या; तेजस्वी यादवांना 'या' ५ चुका पडल्या महागात!
18
Health And Ritual: दुपारच्या जेवणानंतर वामकुक्षी ही पूर्वापार परंपरा; मेंदू होतो सुपरफास्ट!
19
“इंदुरीकर महाराज, फेटा खाली उतरवू नका, सोशल मीडियावरील छपरींकडे दुर्लक्ष करा”; कुणाचे आवाहन?
20
Utpatti Ekadashi 2025: उत्पत्ती एकादशीला 'या' ६ उपायांनी पापमुक्त व्हा; पाहा पूजाविधी!
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’वर शुभेच्छांची बरसात- बारावा वर्धापनदिन थाटात : विविध क्षेत्रातील मान्यवरांची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 01:04 IST

सातारा : ऐतिहासिक सातारा जिल्ह्याच्या हृदयसिंहासनावर तब्बल एक तपापासून अधिराज्य गाजविणाऱ्या ‘लोकमत’वर मंगळवारी वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छांची बरसात झाली.

सातारा : ऐतिहासिक सातारा जिल्ह्याच्या हृदयसिंहासनावर तब्बल एक तपापासून अधिराज्य गाजविणाऱ्या ‘लोकमत’वर मंगळवारी वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छांची बरसात झाली. ‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेल्या ‘उद्यमशील सातारा’ या पुरवणीचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सायंकाळी साताऱ्यातील राधिका संकुलमध्ये आयोजित केलेल्या स्नेहमेळाव्याला शेकडो वाचकांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

‘लोकमत’चे संस्थापक संपादक व थोर स्वातंत्र्यसेनानी जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेला अभिवादन करून या स्नेहमेळाव्याचे उद्घाटन खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते झाले.यावेळी साताऱ्याच्या नगराध्यक्षा माधवी कदम, खटावचे पंचायत समिती सभापती संदीप मांडवे, नगरसेवक किशोर शिंदे, साहित्यिक डॉ. राजेंद्र माने, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती सुनील काटकर, प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे, माजी जिल्हा परिषद सदस्य समृद्धी जाधव यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.

‘लोकमत’ने १२ व्या वर्धापनदिनानिमित्त प्रसिद्ध केलेल्या ‘उद्यमशील’ सातारा या पुरवणीचे प्रकाशन जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संदीप शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, संपादक वसंत भोसले, वरिष्ठ शाखा व्यवस्थापक संतोष भोगशेट्टी, आवृत्तीप्रमुख सचिन जवळकोटे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.

आमदार शंभूराज देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती मनोज पवार, समाजकल्याण सभापती शिवाजी सर्वगोड, जिल्हा परिषदेचे सदस्य मनोज घोरपडे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई, बाजार समितीचे सभापती विक्रम पवार, नीलेश जगदाळे, निवृत्त विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे, प्रा. रमणलाल शहा, श्रीकांत शेटे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, उपवनसंरक्षक अनिल अंजनकर, वनक्षेत्रपाल महेश पाटील, शिवाजी कॉलेजचे रजिस्टार डॉ. अरुणकुमार सकटे, वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता संजय साळे, अभियंता जीवन माने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनील बोरकर, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सुहास नाडगौडा, शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, सातारा तालुका ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीपकुमार जाधव, सातारा शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक पद्माकर घनवट, सहायक पोलीस निरीक्षक आरिफा मुल्ला, डॉ. सुहास माने, शिवछत्रपती पुरस्कार विजेते अमित नलावडे, मनीषा शिंदे-नलावडे, जिल्हा परिषदेचे अजय राऊत, गणेश चव्हाण, संजय जाधव, अमोल पवार, गोपीचंद पवार, ज्ञानेश्वर पवार, प्रशांत तुपे, धन्वंतरी पतसंस्थेचे अध्यक्ष डॉ. रवींद्र भोसले, सरव्यवस्थापक संजय पवार, भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत, गौरीशंकर नॉलेज सिटीचे मिलिंद जगताप, जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर, नितीन मुडलगीकर, चिन्मय कुलकर्णी, नगरसेवक विजय काटवटे, नगरसेविका आशा पंडीत, किशोर पंडित, माजी नगराध्यक्ष विजय बडेकर, माजी उपाध्यक्ष राजू भोसले, अप्पा कोरे यांच्यासह असंख्य लोकांनी प्रत्यक्ष भेटून ‘लोकमत’वर शुभेच्छांचा वर्षाव केला.

‘लोकमत’ने नेहमीच विधायक उपक्रमांना पाठबळ दिले आहे. सर्वच स्तरातील वाचकांची अभिरुची लक्षात घेऊन ‘लोकमत’ने लिहित्या हातांनाही बळ दिले. गुडन्यूज, कॉफी टेबल, सर्व्हे न्यूज या माध्यमातून शोधक वृत्ती ठेवून समाजातील घडामोडींना कायमच न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.

या स्नेहमेळाव्यात राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, बँकिंग, सांस्कृतिक, पर्यावरण, आरोग्य, उद्योग-व्यवसाय, बांधकाम क्षेत्रातील मान्यवर ‘लोकमत’चे हितचिंतक, जाहिरातदार व वृत्तपत्र एजंट, विक्रेते यांच्यासह सर्व स्तरांतील मान्यवर तसेच वाचकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.जिल्हाधिकारी ‘लोकमत’ कार्यालयातजिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना मुंबईला जायचे होते, तरीही त्यांनी मंगळवारी सकाळीच ‘लोकमत’ कार्यालयात येऊन शुभेच्छा दिल्या. केंद्रीय लोकसेवा आयोगाचा अभ्यास करत असताना ‘लोकमत’ मी कायम वाचत होते, अजूनही ‘लोकमत’ मधील बातम्यांच्या माध्यमातून समस्यांच्या मुळापर्यंत जाणे सोपे जाते, असे गौरवोदगारही जिल्हाधिकाऱ्यांनी काढले.