शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

‘भुपाळी ते भैरवी’त सखी दंग

By admin | Updated: December 16, 2014 00:18 IST

हाऊसफुल्ल : ग्रामजीवनात ओवी, भारुड, गवळण, वासुदेव, हेळवी सादर

सातारा : ‘लोकमत सखी मंच’ आयोजित ‘भुपाळी ते भैरवी’ या कार्यक्रमात सखींना लोकसंस्कृतीचे दर्शन घडले. कलाकारांनी ओवी, भारुड, भुपाळी, गवळण, वासुदेव, हेळवी, मरिआईचा गाडा, बहुरूपी अशी ग्रामजीवनातील विविध रूपे सादर करीत सखींची दाद मिळविली. येथील शाहू कला मंदिरमधील या कार्यक्रमाचे उद्घाटन जिजाऊ प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सिद्धी पवार यांच्या हस्ते ‘लोकमत’चे संस्थापक दिवंगत जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी किरण लाहोटी, संपत कदम, कृष्णात पाटोळे आदी उपस्थित होते. पहिल्यांदा भुपाळी सादर करण्यात आली. पूर्वीच्या काळी जात्यावर धान्य दळण्यात येत होते. पहाटेच्या सुमारास घरोघरी जात्यावर धान्य दळताना ओव्या म्हणायच्या. याचेही दर्शन या ओवीतून झाले. पहाटे हातात कंदिल घेऊन कुडमुड वाजवत येणारा पिंगळा जोशी कशा प्रकारे बोलतो. त्याला पक्ष्यांची भाषा कशी समजते, हे दाखविण्यात आले. तसेच १८ पिढ्यांचा इतिहास सांगणारा हेळवी, सकाळच्या सुमारासच येणारा वासुदेव यांच्या सोबत मरिआईचा गाडा, लावणी, धनगरी गीतही सादर करण्यात आले. या कार्यक्रमाचे सादरीेकरण निर्माते प्रमुख संपत कदम, सूत्रधार कृष्णात पाटोळे, मिलिंद कांबळे, महेश नवाळे, नरेंद्र हराळे, कुणाल मसाले, सिकंदर पीरजादे, हेमंत थोरात, अभिजित कदम, प्रा. जयश्री कदम, रोहिणी आढाव, वैष्णवी जाधव, वर्षा जाधव, अबोली कदम, अवधुत माने, संजय घोलप यांनी केले. चंदुकाका सराफ यांच्यातर्फे काढण्यात आलेल्या लकी ड्रॉमध्ये सुवर्णनथच्या मानकरी मीना झाड या ठरल्या. यावेळी वरद फर्निशिंगतर्फे दोन कर्टन सेट, लाहोटी कलेक्शनतर्फे तीन साड्या, इम्प्रेशन ब्युटी पार्लरतर्फे पाच फेशियल, समन्वय लॅग्वेंज स्कूलतर्फे तीन स्पोकन इंग्श्लि कोर्सचा लकी ड्रॉ काढण्यात आला.सर्व विजेत्यांना लाहोटी कलेक्शनच्या किरण लाहोटी व सिद्धी पवार यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. (प्रतिनिधी)‘भुपाळी ते भैरवी’ या कार्यक्रमाचे प्रायोजकत्व नामांकित आयुर्वेदाचार्य डॉ. सुयोग दांडेकर यांच्या प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्ट आणि जिजाऊ प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सिद्धी पवार यांनी स्वीकारले होते.