शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
4
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
6
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
7
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
8
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
9
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
10
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
11
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
12
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
13
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
14
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
15
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
16
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
17
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
18
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
19
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
20
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार

मला धक्के देण्याची सवय;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : काम पूर्णत्चास गेलेला ग्रेड सेपरेटर सातारकरांसाठी कधी खुला होणार याची उत्सूकता सातारकरांना असतानाच खासदार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : काम पूर्णत्चास गेलेला ग्रेड सेपरेटर सातारकरांसाठी कधी खुला होणार याची उत्सूकता सातारकरांना असतानाच खासदार उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारी सकाळीच फीत कापून उद्घाटन केले. यामुळे अनेक चर्चांना उधाण आले. तर याचवेळी पत्रकारांनी केलेल्या उद्घाटन अचानकपणे का या प्रश्नावर त्यांनी ‘मला धक्के देण्याची सवय आहे. कधी मी देतो, तर कधी मला बसतो. आदस से मजबूर हूँ,’ असेही दिलखुलासपणे सांगत हशा पिकविला.

वाहतूक कोंडीतून सातारकरांची सुटका करणाऱ्या पोवई नाक्यावरील ग्रेड सेपरेटरचे काम पूर्णत्वास गेले आहे. त्यामुळे सेपरेटरच्या उद्घाटनाचीच प्रतिक्षा होती. ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर याला मुहुर्त मिळेल अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. पण, खासदार उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारी सकाळीच पाहणीसाठी गेल्यानंतर फित कापून ग्रेड सेपरेटर सातारकरांसाठी खुला झाल्याचे जाहीर केले. तसेच त्यांनी ग्रेड सेपरेटरमधून वाहनातून प्रवासही केला. यावेळी नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, नगरसेवक अ‍ॅड. दत्ता बनकर, किशोर शिंदे, राजू भोसले, श्रीकांत आंबेकर, निशांत पाटील, मिलिंद काकडे, स्नेहा नलवडे, सविता फाळके, सीता हादगे यांच्यासह इतर नगरसेवक व सातारकर नागरिक उपस्थित होते.

यावेळी पत्रकारांशी बोलताना खासदार उदयनराजे म्हणाले, ‘साताऱ्यातील ग्रेड सेपरेटर महत्वूपर्ण होता. यामुळे वाहतुकीची कोंडी टळणार आहे. हा ग्रेड सेपरेटर पूर्ण झाल्याने सातारा विकास आघाडीच्या वतीने देण्यात आलेले वचन पूर्ण झालेले आहे. या सेपरेटरचे उद्घाटन झाले असून तो सातारकरांसाठी खुला झाल्याचे जाहीर करतो.

माझ्या राजकीय कारकिर्दीची सुरूवात नगरसेवकापासून झाली. पुढे आमदार, मंत्री आणि संत्रीही झालो. त्यानंतर खासदारही झालो. यासाठी सातारकरांनी नेहमीच मला सहकार्य केले, असेही उदयनराजेंनी यावेळी स्पष्ट केले.

चौकट :

सेपरेटर अभी के अभी खुला...

यावेळी पत्रकारांनी उदयनराजेंना ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन केल्याने राज्यातील नेते नाराज होणार नाहीत का असा प्रश्न केला. यावर उदयनराजे म्हणाले, ‘जनता सुखी तर सर्व सुखी. मी फारसा कोणाचा विचार करत नाही. सर्वसामान्यांसाठी सेपरेटर आजच आणि अभी के अभी खुला झाला. सातारकरांसाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. सातारकरांची वचनपूर्ती झाली आहे. आम्ही करुन दाखवलंय. लोकांच्या विश्वासामुळेच हे शक्य झालं, असंही उदयनराजेंनी स्पष्ट केले.

चौकट :

७५ कोटी रुपये खर्च...

सातारा शहरातील वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न कायमस्वरुपी सुटावा, यासाठी पोवई नाक्यावर ग्रेड सेपरेटरचे काम सुरू करण्यात आले होते. गेल्या पावणे तीन वर्षांपासून यंत्रणा कामाली होती. सुरुवातीला ६० कोटी रुपयांचे हे काम होते. मात्र, त्यानंतर गोडोलीकडे जाणाऱ्या मार्गाचे अधिक काम करण्यात आले. त्यासाठी अतिरिक्त १५ कोटी रुपये मंजूर झाले होते. त्यामुळे संपूर्ण ग्रेड सेपरेटरचे काम हे ७५ कोटींवर गेले.

फोटो ०८ग्रेड सेपरेटर...

फोटो ओळ : सातारा येथील ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले. यावेळी नगराध्यक्षा माधवी कदम, उपनरागध्यक्ष मनोज शेंडे, अ‍ॅड. दत्ता बनकर, निशांत पाटील आदी उपस्थित होते. (छाया : जावेद खान)

........................................................................