शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

तब्बल सहा लाखांचा गुटखा जप्त

By admin | Updated: September 24, 2015 23:57 IST

शामगाव घाटात कारवाई : हैदराबादहून रत्नागिरीकडे चालली होती चोरटी वाहतूक

मसूर : हैदराबाद येथून रत्नागिरीकडे गुटख्याची चोरटी वाहतूक करणारा मालट्रक पकडून त्यातील ३५ पोत्यांतील सुमारे ६ लाख ८२ हजार ५०० रुपयांचा गुटखा व अंदाजे १० लाख रुपये किमतीचा ट्रक असा सुमारे १७ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई मसूर पोलिसांनी शामगाव घाटात गुरुवार, दि. २४ रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास केली.याबाबत माहिती अशी की, उंब्रजचे सहायक पोलीस निरीक्षक एम. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मसूर पोलीस दूरक्षेत्राचे सहायक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख व पोलिसांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शामगाव घाटात नाकाबंदी केली होती. याचवेळी घाटात शामगावकडून कऱ्हाडकडे पांढऱ्या तपकिरी रंगाचा मालट्रक (एमएच ४३ वाय १४३५) निघाला होता. ट्रकबाबत संशय आल्याने वाहनचालक लक्ष्मण भगवान कदम याच्यासमोर तपासणी केली असता ट्रकमधील इतर मालांच्या पोत्याच्या पाठीमागे लपविलेला ३५ पोती गुटखा आढळला. त्यानंतर संबंधित ट्रक चालक व क्लिनरसह मसूर पोलीस दूरक्षेत्रात आणला. अन्नऔषध प्रशासन अधिकारी राजेंद्र काकडे व अन्नसुरक्षा अधिकारी यू. एस. लोहकरे , व्ही. बी. कोळे यांना माहिती दिली. अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांनी दोन पंच व पोलिसांसमोर ३५ पोत्यांची तपासणी केली असता प्रत्येक बॅगमध्ये ५० पॅकेटमधील प्रत्येक पॅकेटमध्ये ६५ गुटख्याची पाकिटे आढळून आली. या गुटख्यावर महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेली असल्याने गुटख्यासह मालट्रक जप्त करण्यात आला. राजेंद्र काकडे यांनी मसूर पोलीस दूरक्षेत्रात फिर्याद दिली आहे. या कारवाईमुळे मसूर पोलिसांचे कौतुक होत आहे. (वार्ताहर)फोनवरील मागणीनुसार वाहतूकनिनावी फोनवरून आलेल्या व्यक्तीला हा गुटखा पोहोचविला जाणार होता. हा ट्रक मुंबई येथील अब्दुल वाहब शेख यांच्या मालकीचा असल्याचे चौकशीत समोर आले आहे. या गुटख्याची किंमत सरकारी दरानुसार सहा लाख ८५ हजार रुपये असली तरी बाजारभावाप्रमाणे ४० लाख रूपये किंमत होत आहे.