शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

कवठेतील शेतकऱ्यांवर गुढीपाढव्याला ‘संक्रांत’

By admin | Updated: March 29, 2017 01:06 IST

लाखोंचं नुकसान : वीस गुंठे क्षेत्रातील ऊस शॉर्टसर्किटने तर बाराशे पेंढ्या कडबा जळून खाक

कवठे : गुढीपाडव्याच्या दिवशीच कवठे येथील एका शेतकऱ्याच्या शेतात ऊस तर दुसऱ्या शेतकऱ्याचा कडबा जळून खाक झाला. ऐन दुष्काळात नुकसान झाल्याने त्यांच्यावर ‘संक्रांत’च आली आहे.येथील चंद्र्रकांत तुकाराम ससाणे यांच्या डाळिंबाच्या शिवारातील २० गुंठे क्षेत्रातील ऊस शॉर्टसर्किटने जळाला तर दुसऱ्या घटनेत १२०० पैंड्या वैरण जळाली. चंद्रकांत ससाणे यांच्या डाळिीब या शिवारात २० गुंठे ऊस होता. त्यापैकी लागणीचा ऊस नुकताच त्यांनी कारखान्यास दिला होता. तर बियाण्यासाठी पाचशेच्या आसपास ऊस राखून ठेवलेला होता. त्यांच्या याच शेतामध्ये विहीर असून, या शेतातून विद्युत वाहिनी गेलेल्या आहेत. मंगळवार, दि. २८ रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास जोरदार वारा सुटला. यामध्ये विद्युत पुरवठा करणाऱ्या तारा एकमेकांना चिकटल्या व शॉर्टसर्किट झाले. ठिणग्या उसामध्ये पडून नुकताच उगवलेला खोडवा व बियाण्यासाठी राखून ठेवलेला २० गुंठे क्षेत्रातील ऊस जाळून खाक झाला. शेतामध्ये ठिबक सिंचनासाठी टाकलेल्या पाईपसुद्धा आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने अंदाजे १५ ते २० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे प्रथमदर्शनी आढळले. वीजवितरण कंपनी कवठेच्या वतीने शेताची पाहणी करून घटनास्थळाचे फोटो काढण्यात आले आहेत.दुसऱ्या घटनेत शामराव ससाणे व मल्हारी ससाणे या दोघांची वैरण आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. ही आग सोमवार, दि. २७ रोजी दुपारी एकला लागली. यामध्ये मल्हारी ससाणे यांनी सहाशे कडब्याची लावलेली गंज व शामराव ससाणे यांचा सहाशे पेंड्या कडबा जळाला. आगीचे कारण समजू शकले नाही. या आगीमध्ये अंदाजे ५० हजारांचे नुकसान झाले. आग निदर्शनास आल्यावर प्रचंड वाऱ्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवता आले नाही. वैरणीचे दर गगनाला भिडले असून, बाराशे पेंड्या कडबा जळाल्याने दुभत्या गुरांसाठी पुन्हा वैरण खरेदी करण्याची वेळ ससाणे यांच्यावर आली आहे. (वार्ताहर)