शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

कवठेतील शेतकऱ्यांवर गुढीपाढव्याला संक्रांत

By admin | Updated: March 28, 2017 17:11 IST

लाखोंचं नुकसान : ऊस व बाराशे पेंढ्या कडबा खाक

आॅनलाईन लोकमत

कवठे (सातारा), दि. २८ : गुढीपाडव्याच्या दिवशीच कवठे येथील एका शेतकऱ्याच्या शेतात ऊस तर दुसऱ्या शेतकऱ्याचा कडबा जळून खाक झाला. ऐन दुष्काळात नुकसान झाल्याने त्यांच्यावर संक्रांतच आली आहे.येथील चंर्द्रकांत तुकाराम ससाणे यांच्या डाळिंबाच्या शिवारातील २० गुंठे क्षेत्रातील ऊस शॉर्टसर्किटने जळाला तर दुसऱ्या घटनेत १२०० पैंड्या वैरण जळाली .चंद्रकांत ससाणे यांच्या डाळिीब या शिवारात २० गुंठे ऊस होता. त्यापैकी लागणीचा ऊस नुकताच त्यांनी कारखान्यास दिला होता. तर बियाण्यासाठी पाचशेच्या आसपास ऊस राखून ठेवलेला होता. त्यांच्या याच शेतामध्ये विहीर असून, या शेतातून विद्युत वाहिनी गेलेल्या आहेत. मंगळवार, दि. २८ रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास जोरदार वारा सुटला. यामध्ये विद्युत पुरवठा करणाऱ्या तारा एकमेकांना चिकटल्या व शॉर्टसर्किट झाले. ठिणग्या उसामध्ये पडून नुकताच उगवलेला खोडवा व बियाण्यासाठी राखून ठेवलेला २० गुंठे क्षेत्रातील ऊस जाळून खाक झाला. शेतामध्ये ठिबक सिंचनासाठी टाकलेल्या पाईपसुद्धा आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने अंदाजे १५ ते २० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे प्रथमदर्शनी आढळले. वीजवितरण कंपनी कवठेच्या वतीने शेताची पाहणी करून घटनास्थळाचे फोटो काढण्यात आले आहेत.दुसऱ्या घटनेत शामराव ससाणे व मल्हारी ससाणे या दोघांची वैरण आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. ही आग सोमवार, दि. २७ रोजी दुपारी एकला लागली. यामध्ये मल्हारी ससाणे यांनी सहाशे कडब्याची लावलेली गंज व शामराव ससाणे यांचा सहाशे पेंड्या कडबा जळाला. आगीचे कारण समजू शकले नाही. या आगीमध्ये अंदाजे ५० हजारांचे नुकसान झाले. आग निदर्शनास आल्यावर प्रचंड वाऱ्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवता आले नाही. वैरणीचे दर गगनाला भिडले असून, बाराशे पेंड्या कडबा जळाल्याने दुभत्या गुरांसाठी पुन्हा वैरण खरेदी करण्याची वेळ ससाणे यांच्यावर आली आहे.शॉर्टसर्किटने आग लागली व शेतकऱ्यांचे नुकसान झाले. नुकसान भरपाई विद्युत वितरण कंपनीकडून मिळण्यासाठी खूप मोठी प्रक्रिया पार पाडावी लागते. मंगळवारी लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाले आहे. तोंडावर उन्हाळा असल्याने लवकर नुकसान भरपाई मिळावी. - चंद्रकांत ससाणे,शेतकरी कवठे.