कऱ्हाड : सुपने, ता. कऱ्हाड येथे सर्व क्रांतिकारक स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करण्यात आले. सरपंच अशोक झिंब्रे यांच्यासह उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. प्रथम स्वातंत्र्यसैनिकांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शिवाजी पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी एच. डी. पाटील, प्रकाश पाटील, आनंदराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सरपंच अशोक झिंब्रे यांनी आभार मानले.
कऱ्हाड कचेरीवरील मोर्चाचा वर्धापनदिन
कऱ्हाड : उंडाळे, ता. कऱ्हाड येथे क्रांतीज्योत प्रज्वलित करून स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर यांनी कऱ्हाडच्या तहसीलदार कचेरीवर काढलेल्या मोर्चाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आनंदराव पाटील यांनी स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून क्रांतीज्योत प्रज्वलित केली. यावेळी प्राचार्य बी. आर. पाटील, सरपंच संगीता माळी, माजी सरपंच दादासाहेब पाटील, ग्रामपंचायत सदस्य गणेश पाटील यांच्यासह ग्रामस्थ, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
मलकापूर कन्याशाळेत क्रीडा दिन उत्साहात
कऱ्हाड : मलकापूर येथील मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या कन्याशाळेत हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी प्रतिमेचे पूजन लक्ष्मण जिरंगे यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्याध्यापिका सुलोचना भिसे, पर्यवेक्षक सुरेश राजे, क्रीडा विभागप्रमुख जयवंत पाटील, सीताराम कोळेकर, योगेश खराडे, प्रकाश कदम, जान्हवी पाटील, स्नेहल सूर्यवंशी, शर्वरी शिंदे, सृष्टी जाधव, पायल वायदंडे, वेदिका घोरपडे आदी उपस्थित होते. जयवंत पाटील यांनी मेजर ध्यानचंद यांचे हॉकी खेळातील योगदान विषद केले. योगेश खराडे यांनी सूत्रसंचालन केले. सुरेश राजे यांनी आभार मानले.
‘टिळक’मध्ये मेजर ध्यानचंद यांची जयंती
कऱ्हाड : येथील टिळक हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक कीर्तीचे हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक जी. जी. अहिरे, उपप्राचार्य डी. बी. देसाई, उपमुख्याध्यापक के. पी. वाघमारे, क्रीडा विभागप्रमुख बी. आर. यादव, जे. एम. थोरात यांची उपस्थिती होती. यावेळी ‘हॉकीचे जादूगार’ या भित्तीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. जे. एम. थोरात यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.