शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

फलटणमध्ये उभारलेल्या विजयस्तंभ प्रतिकृतीस अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:37 IST

फलटण : ब्रिटिश सैन्य दलातील महार बटालीयनने २०० वर्षांपूर्वी पेशव्यांच्या विरुद्ध लढताना दाखविलेल्या शौर्याचे स्मरण आणि त्या ...

फलटण : ब्रिटिश सैन्य दलातील महार बटालीयनने २०० वर्षांपूर्वी पेशव्यांच्या विरुद्ध लढताना दाखविलेल्या शौर्याचे स्मरण आणि त्या युद्धात धारातीर्थी पडलेल्या सैनिकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ब्रिटिशांनी उभारलेल्या विजयस्तंभ प्रतिकृतीस अभिवादन करण्यासाठी शासकीय अधिकारी आणि शहर व तालुक्यातील मान्यवरांसह जनतेने दिवसभर मोठी गर्दी केली होती.

फलटणमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे भीमा कोरेगाव विजयस्तंभाची प्रतिकृती उभारून, मानवंदना देण्याचे नियोजन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या माध्यमातून करण्यात आले होते; परंतु जिल्ह्यात लावण्यात आलेली जमावबंदी तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि नूतन वर्षारंभाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून हा विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम भारतरत्न डॉ. आंबेडकर स्मृतिभवन, भीमस्फूर्ती भूमी (शेरी), मंगळवार पेठ येथे आयोजित केला होता.

याप्रसंगी प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, नगर परिषद मुख्याधिकारी प्रसाद काटकर, शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राऊळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, नगरसेवक उपस्थित होते. तसेच डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. याप्रसंगी जयंती महोत्सव समिती पदाधिकारी, सदस्य, विद्यार्थी, नागरिकांनी घोषणा देऊन भीमा कोरेगाव शौर्य दिन साजरा केला.

फोटो :०२फलटण-अभिवादन

फलटण येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे उपस्थित होते. (छाया : नसीर शिकलगार)