शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

रेठरेच्या ग्रामस्थांनी घेतली हरित शपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:04 IST

रेठरे बुद्रुक, ता. कऱ्हाड ग्रामपंचायत, माझी वसुंधरा अभियान, ग्रामकृती गट समिती आणि या अभियानासाठी नियुक्त स्वयंसेवी संस्था म्हणून ज्ञानदीप ...

रेठरे बुद्रुक, ता. कऱ्हाड ग्रामपंचायत, माझी वसुंधरा अभियान, ग्रामकृती गट समिती आणि या अभियानासाठी नियुक्त स्वयंसेवी संस्था म्हणून ज्ञानदीप राष्ट्रीय सामाजिक व शैक्षणिक विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत सभागृह, ताराबाई माधवराव मोहिते विद्यालय आणि प्राथमिक शाळा अशा तीन ठिकाणी हरित शपथ घेण्यात आली. गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, सरपंच सुवर्णा कापूरकर, उपसरपंच शिवाजी चव्हाण, ज्ञानदीप संस्थेचे अध्यक्ष आनंदा थोरात, प्रकल्प समन्वयक बाजीराव पाटील, कृष्णा महाविद्यालयाचे डॉ. प्रा. स्नेहल राजहंस, डॉ. प्रा. व्ही. के. सोनवणे, तलाठी प्रशांत पाटील, मुख्याध्यापिका सुजाता पवार आदींनी सहभाग घेतला.

शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या निर्णयानुसार पृथ्वी, वायू, जल, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वावर आधारित माझी वसुंधरा अभियान राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत राबविण्यास सुरुवात झाली आहे. या अभियानात रेठरे ग्रामपंचायतीचा सहभाग असून वसुंधरेच्या प्रति आपली जबाबदारी म्हणून गावातील लोकप्रतिनिधींसह अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवित कोरोनाविषयक नियमांचे पालन करीत शपथ घेतली.

- चौकट

वृक्षसंगोपन, सौरऊर्जा वापराचा निर्धार

पर्यावरण संरक्षणाच्या सर्व नियमांचे पालन करीन, मी माझे घर व परिसर स्वच्छ व सुंदर ठेवीन, घरातील ओला कचरा, सुका कचरा, प्लास्टिक कचरा यांचे वर्गीकरण करेन, मी उपलब्ध सर्व ठिकाणी वृक्षलागवड करेन व त्यांचे संगोपन करेन, पारंपरिक ऊर्जेचा वापर कमीत कमी करून सौरऊर्जेचा वापर करेन, घराच्या छतावरील पाणी जमिनीत मुरवून भूजलाच्या वाढीस मदत करेन, अशी शपथ यावेळी घेण्यात आली.

फोटो : ०६केआरडी०३

कॅप्शन : रेठरे बुद्रूक, ता. कऱ्हाड येथील ग्रामपंचायत कार्यालयात पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी हरित शपथ घेतली.