शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

हिरव्या पट्ट्यावर खासगीकरणाची मदार

By admin | Updated: September 30, 2015 00:09 IST

पाटण तालुका : नवनवीन ऊसप्रक्रिया प्रकल्पांची घोषणा

मल्हारपेठ : तालुक्यात नवीन ऊस प्रक्रिया प्रकल्पाची घोषणा झाल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यात आनंदी वातावरण आहे. सहकारातील प्रस्थापितांना खासगीकरणाच्या लाटेत नवीन प्रकल्पांना तोंड देताना दमछाक होऊन फटका बसण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू आहे. जादा ऊस क्षेत्र असल्यामुळे हिरव्या पट्ट्यावर खासगीकरणाची मदार असून याचा फायदा तालुक्यातील ऊस उत्पादकांना होऊन बळीराजाला चांगले दिवस येतील, अशी चर्चा तालुक्यातील शेतकरी वर्गात सुरू आहे.पाटण तालुक्यातील कोयना नदी तीरावरील विहे ते येराडपर्यंतचा भाग हा हिरवा पट्टा म्हणून प्रसिद्ध आहे. या भागात ऊस उत्पादन घेणारे अनेक लहान-मोठे शेतकरी आहेत. तालुक्यात एकच साखर कारखाना असल्यामुळे गेल्या चार-पाच वर्षांपासून ऊस उत्पादक जादा दरासाठी पर्यायी तालुक्याच्या बाहेर ऊस घालत होते. तालुक्यात लहान-मोठे सिंचन प्रकल्प झाल्यामुळे ऊस उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. मात्र तालुक्यातील कारखान्याकडून इतर कारखान्याच्या तुलनेत कमी प्रमाणात दर मिळत असल्यामुळे शेतकरी वर्ग नाराज होता. त्यामुळे अगदी वाळवा तालुक्यातील कारखान्यालाही मोठ्या प्रमाणात ऊस जात होता. गत पंचवार्षिक निवडणुकीत तर ऊस तोडणीवरून मोठे राजकारण झाले. नुकतीच माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी तालुक्यातील नवीन तीन ठिकाणी पाटण शुगर केन प्रकल्प काढण्याची घोषणा केल्यामुळे तालुक्यातील राजकारण तापले. याबाबत दोन दिवसांपूर्वी झालेल्या कारखान्याच्या वार्षिक सभेत आमदार शंभूराज देसाई यांनी हा प्रकल्प खासगी असून ऊस उत्पादक सभासदांना त्याचा काय फायदा आहे, असा सवाल केला आहे. तर नुकतीच दोन दिवसांपूर्वी विहे गावाच्या हद्दीत नवीन १०० कोटींचा गगनगिरी अ‍ॅग्रो केन इंडस्ट्रीज प्रकल्पाची उद्योजक चंद्रकांत कदम यांनी घोषणा केल्यामुळे वातावरण आणखीनच तापले आहे.पाटण तालुक्यात ऊसप्रक्रिया करणारे नवीन चार खासगी प्रकल्प व एक सहकारी कारखाना होणार असल्यामुळे त्यांच्यातील स्पर्धेमुळे ऊस उत्पादकांना चांगले दिवस येतील, अशी चर्चा सुरू आहे. उसाची साखर होवो किंवा गुळाची पावडर होवो किंवा कोणीही कोणताही प्रकल्प सुरू करो आपल्याला फक्त जादा दर मिळणे गरजेचे आहे. आजपर्यंत राजकारण करून आपण आपला तोटा केला आहे. आता जादा दर देणार व लकवर ऊस नेणार त्यांच्याकडे ऊस घालायचा, अशी चर्चा आहे. (वार्ताहर)सहकारी कारखान्यांच्या व्यवस्थापकांना फटकानवीन खासगी प्रकल्पाची निर्मिती झाल्यानंतर सहकारातील प्रस्थापितांना खासगीकरणाच्या लाटेत सहकार चालविणे अवघड जाणार आहे. खासगी प्रकल्पाची घोषणा केली तरी नुकत्याच झालेल्या कारखान्याच्या वार्षिक सभेत आमदार देसाई यांनी डिस्टलरी किंवा को-जनरेशन प्रकल्प सुरू करण्याची घोषणा केली. तालुक्यात नवीन प्रकल्प आल्यामुळे अनेक कुटुंबातील तरूणांना नोकऱ्या लागणार आहेत. नवीन प्रकल्पांच्या स्पर्धेत ऊस उत्पादकांचा फायदा तर नक्कीच होणार; मात्र सहकार तत्वावरील कारखाना व्यवस्थापकांना मोठा फटका बसणार आहे.