शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

वाढे फाटा परिसर बनलाय ‘विवस्त्र मृतदेहांचा झोन’

By admin | Updated: July 11, 2016 00:59 IST

पोलिसांचा तपास ‘बेवारस’ : सातारकरांमध्ये चर्चेला उधाण; पाच मृतदेह सापडल्याने तर्कवितर्क

दत्ता यादव ल्ल सातारा आठवड्यातून एकदा तरी कुठे ना कुठे बेवारस मृतदेह पोलिसांना सापडतच असतो, त्यामुळे पोलिसांना त्याचे फारसे काही वाटत नाहीय; परंतु गेल्या दोन महिन्यांत वाढे फाटा परिसरात तब्बल पाचजणांचे बेवारस मृतदेह सापडल्याने अनेक तर्कवितर्क सुरू झाले. त्यातच एकाही मृतदेहाची आजपर्यंत ओळख पटली नसल्याने पोलिसांचा तपासही आता ‘बेवारस’ झालाय. वाढे फाटा विवस्त्र मृतदेहांचा झोन बनत असल्याने पोलिसही संभ्रमात पडले आहेत. वाढे फाटा येथून महामार्ग जात असल्याने नेहमी वर्दळ असते; मात्र गेल्या दोन महिन्यांपासून हे ठिकाण वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहे. सुरुवातीला मे महिन्यामध्ये एका पाण्याच्या डबक्यात पुरुषाचा विवस्त्रावस्थेत मृतदेह आढळला होता. नेहमीप्रमाणे पोलिसांनी त्याचा तपास सुरू केला; परंतु लगेच दुसऱ्या आठवड्यात त्याच ठिकाणाहून पाचशे मीटर अंतरावर एका स्त्रीचाही विवस्त्रावस्थेत मृतदेह आढळून आला. एकापोठोपाठ दोन मृतदेह आढल्याने वेगाने तपास सुरू झाला. काही दिवस उलटताच पुन्हा याच ठिकाणी आणखी तीन मृतदेह आढळले. त्यामुळे पोलिसांच्या भुवया उंचावल्या. केवळ दोन महिन्यांत पाच बेवारस मृतदेह आढळून आल्याने पोलिस दलही हादरून गेले आहे. या सर्व मृतदेहांची ओळख पटविण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. मात्र तो फोल ठरत आहे. तपास सुरू आहे की नाही, हे ही कोणाला समजेनासे झाले आहे. बेवारस व्यक्तींचा तपास लागलाच पाहिजे, असा आग्रह धरणारे कोणी नसल्याने पोलिसांकडूनही चालढकल होण्याची दाट शक्यता असते. बेवारस व्यक्तीच्या नातेवाइकांचा शोध लागला नाही तर पोलिस ‘फाईल’बंद करतात; परंतु केवळ दोन महिन्यांच्या फरकाने या ठिकाणी पाच मृतदेह सापडल्याने शंका-कुशंकांना वाव मिळालाय. या ठिकाणी बोहरून कोणी मृतदेह आणून टाकत तर नसेल ना, अशी शंकाही आता पोलिसांना येऊ लागली आहे. त्या दृष्टीनेही पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली आहेत. शवविच्छेदन अहवाल गुलदस्त्यात ! विवस्त्रावस्थेत महिलेचा मृतदेह आढळून आल्यानंतर त्या महिलेवर अत्याचार झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली होती. म्हणे, प्राथमिक अहवालही अद्याप पोलिसांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितला नाही. यावरूनच या प्रकरणामध्ये नक्कीच काळेबेरे असण्याची शक्यता आहे. विनाकारण कटकट वाढेल, या हेतूने पोलिस या गंभीर प्रकरणावर पडदा तर टाकत नाहीत ना, अशी शंकाही आता निर्माण होत आहे. मृतदेह आणून टाकल्याची शक्यता ! वाढे फाटालगत महामार्ग असल्याने या ठिकाणी बाहेरहून मृतदेह आणून टाकल्याची शक्यताही नाकारता येत नाही. पोलिसांनी जिल्ह्यातील पोलिस ठाण्यात बेवारस मृतदेहांची माहिती घेतली. मात्र, एकाही बेवारस व्यक्तीची ओळख पटली नाही. त्यामुळे हे सापडलेले मृतदेह कदाचित परजिल्ह्यातील असण्याची शक्यता आहे.