शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींना खरेदी करता येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:42 IST

कोरोना पार्श्वभूमीवर निर्णय : १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून उपलब्ध होणार लोगो : जिल्हा परिषदेतून... लोकमत न्यूज नेटवर्क सातारा ...

कोरोना पार्श्वभूमीवर निर्णय : १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून उपलब्ध होणार

लोगो : जिल्हा परिषदेतून...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्ह्यात कोरोनाचे संकट असून ऑक्सिजनचीही समस्या आहे. या पार्श्वभूमीवर १५ व्या वित्त आयोगाच्या निधीमधून ग्रामपंचायतींना ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशीन खरेदी करता येणार आहे. याबाबतचा निर्णय सातारा जिल्हा परिषदेने घेतला आहे. त्यामुळे एखाद्या रुग्णाची ऑक्सिजनअभावी होणारी गैरसोय टाळता येणार आहे.

सातारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचबरोबर रुग्णांना ऑक्सिजनची व्यवस्था न होणे अशा अनेक समस्या समोर येऊ लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विलगीकरण कक्षात असणाऱ्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासते. दुसरीकडे व मोठ्या रुग्णालयात रुग्णाला नेताना प्रवासामध्ये ऑक्सिजनची गरज भासते. तसेच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा विचार करून ग्रामपंचायत स्तरावरील १५ व्या वित्त आयोग निधीमधून ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशीन खरेदी केल्यास संबंधित रुग्णाला फायदा होऊ शकतो. तसेच त्या रुग्णाची काही काळासाठी तरी गैरसोय दूर होऊ शकते. याच विचारातून सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी मशीन खरेदीबाबत निर्णय घेतला आहे.

यासाठी ग्रामपंचायत विकास आराखड्यामध्ये काही बदल करायचा असल्यास त्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना असतात. आता मशीन खरेदी कामाच्या प्रस्तावांना जिल्हा स्तरावरून मान्यता द्यायची झाल्यास विलंब लागू शकतो. हा विलंब टाळण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांना मान्यतेचे अधिकार देण्यात आले आहेत. यामुळे ग्रामपंचायतींना मशीन खरेदी करता येणार आहे. याचा फायदा अनेक रुग्णांना होऊ शकतो.