शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत कर्मचारी लसीकरणापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:40 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांना लसीकरण करण्यात आले, तर काहींना लसीकरण सुरू आहे; पण ...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांना लसीकरण करण्यात आले, तर काहींना लसीकरण सुरू आहे; पण ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांबद्दल शासकीय पातळीवर हालचाली दिसून येत नाहीत. २० मार्चपासून कोरोनाबाधित रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली. आणि बघता-बघता कोरोनाचे लोण ग्रामीण भागात पोहोचले. त्याचा ताण महसूल, आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायतींवर येऊन पडला. यामध्ये सर्व विभागांनी कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी हातात हात घालून काम केले.

गावात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कोरोनाशी लढा देण्यासाठी ग्रामपंचायतीचे कर्मचारी सर्वात पुढे होते. सुरुवातीच्या काळात ज्या प्रभागात रुग्ण सापडेल त्या ठिकाणी कंटेन्मेंट झोन करण्याचे काम ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर होते. तसेच आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका यांच्याबरोबर ग्रामपंचायत कर्मचारी लढ्यात व्यस्त होते. कर्मचाऱ्यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून गावागावांत चोवीस तास काम केले. मात्र, कोरोनाची लस देण्यासाठी दुजाभाव का, असा प्रश्र्न ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांकडून उपस्थित केला जात असून, शासनाने लवकरात लवकर लसीकरण करावे, अशी मागणी होत आहे.