शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

ग्रेड सेपरेटरचा फलक आपसूकच पडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांनी अचानक उद्घाटन केलेल्या ग्रेड सेपरेटरचा फलक शुक्रवारी रात्री अज्ञाताने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांनी अचानक उद्घाटन केलेल्या ग्रेड सेपरेटरचा फलक शुक्रवारी रात्री अज्ञाताने फाडल्याचा समज करत कार्यकर्त्यांनी सकाळी निषेध केला. मात्र, पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर हा फलक अपसूकच खाली पडला असल्याचे निदर्शनास आले.

पोवई नाक्यावरील ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी खासदार उदयनराजे भोसले यांनी अचाकन केले. त्यानंतर हा भुयारी मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. दरम्यान, शुक्रवारी रात्री वायसी कॉलेजसमोरील भुयारी मार्गाचा छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा फलक अज्ञाताने फाडून खाली फेकून दिला, अशी चर्चा शहरात सुरू झाली. त्यानंतर उदयनराजे समर्थकांनी शनिवारी सकाळी पोवई नाक्यावर धाव घेतली.

कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून जलद कृतीदलाच्या दोन तुकड्यांसह मोठ्या संख्येने पोलिसांचा फौजफाटा पोवई नाक्यावर पोहोचला.

या घटनेचा निषेध करत कार्यकर्त्यांनी घोषणा देत संबंधितावर कारवाई करण्याची मागणीही केली होती. उदयनराजे भोसले यांनी घटनास्थळी न येता कार्यकर्त्यांना फोनवर शांतता राखण्याचे आवाहन केले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी पोवई नाक्यापर्यंत मूक मोर्चा काढला. दरम्यान, पोलिसांनी तत्काळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, हा प्रकार इतर कोणी केला नसून, आपसूकच फलक खाली पडला असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे या वादावर आता पडदा पडला आहे.