शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

शासनाने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्त करावे : उदयनराजे

By admin | Updated: January 8, 2017 23:30 IST

पंतप्रधानांना निवेदन : नोटाबंदीमुळे सामान्य नागरिक हवालदिल

सातारा : ‘देशाला लागलेली भ्रष्टाचाराची कीड काढून टाकण्यासाठी पंतप्रधानांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. भ्रष्ट लोकांचा पैसा बाहेर येण्याऐवजी पैशाविना सामान्य जनता हवालदिल झाली. पंतप्रधानांनी काळ्या पैशाविरोधी केलेला हा सर्जिकल स्ट्राईक म्हणजे दुर्धर रोग घालविण्यासाठी विना भूल केलेली शस्त्रक्रिया होय,’ अशी टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. दरम्यान, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्त करावे, अशी मागणीही त्यांनी केली.याबाबत खा. उदयनराजे भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन दिले असून, या निवेदनात म्हटले आहे की, देशातील भ्रष्टाचारी, शासनापेक्षा हुशार निघाले. आपण भ्रष्टाचाराची मोठी मगर पकडण्यासाठी संपूर्ण मोठ्या तलावावर जाळे टाकले; पण भ्रष्टाचाराची मगर चाणाक्षपणे अगोदरच तळ्याबाहेर गेली होती. ज्याप्रमाणे मासे पाण्याशिवाय जगू शकत नाहीत, त्याचप्रमाणे सामान्य माणूस पैशाशिवाय जगू शकतनाही.नोटाबंदीच्या निर्णयामुळे शेतकरी, कंत्राटी कामगार, रस्त्यावरचे व्यापारी, शेतमजूर, किराणा मालाचे दुकानदार, शेती, संबंधित दूध व्यवसाय, मासेमार, लहान व मध्यम उद्योजक यांचे अतोनात नुकसान झाले. नोटाबंदीमुळे शेतमालाचे बाजारभाव ५० टक्क्यांनी कमी झाले आणि मागणीही ५० टक्क्यांनी कमी झाली. डाळिंबाची फळे मागणी अभावी काही ठिकाणी झाडाला सुकली. दुधाची बिले वेळेवर मिळत नाहीत; पण दुभत्या जनावरांना चारा, खुराक मात्र वेळेवर घालावा लागतो.आपण दोन महिन्यांचे व्याज पीक कर्जावरील माफकेले आहे, असे जाहीर केले आहे. वस्तुस्थिती पाहिल्यास एका सहकारी बॅँकेने ६३० कोटींचे पीक कर्ज एकूण २ लाख शेतकऱ्यांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना दि. १ एप्रिल ते ३१ डिसेंबर २०१६ या खरीप व रब्बी हंगामासाठी वाटलेले आहेत. याचा विचार केल्यास, प्रत्येक शेतकऱ्याला १९८ रुपये म्हणजे शेतमजुराच्या अर्ध्या दिवसाची मजुरी इतकी रक्कम मिळते, असेही निवेदनात म्हटले आहे. (प्रतिनिधी)पीक कर्ज दोन टक्के व्याजदराने देण्यात यावे...पंतप्रधांना दिलेल्या निवेदनात शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्त करण्यात यावी, शेतीचे भांडवली व पीक कर्ज सरळ व्याजदर पद्धतीने वार्षिक २ टक्के व्याजदराने देण्यात यावे, सिंचन, प्रक्रिया, साठवणूक, दळणवळण आदी सोयी योजनेतून पूर्ण करण्यात याव्या, शेती व पूरक व्यवसायातील उत्पन्नाला प्रत्यक्ष उत्पादन खर्चावर आधारित कायद्याने बाजारभाव देण्यात यावा, शेतकऱ्यांना अस्मानी व सुलतानी संकटापासून सुरक्षित करण्यासाठी जगातील प्रगत देशाप्रमाणे शेती उत्पन्नातील जोखमीचे व्यवस्थापन करावे, त्यामुळे भविष्यात भारतातील शेतकरी पत्नीसह पेन्शनयुक्त व अनारोग्यापासून संरक्षित होईल आणि शेती अनुदान मुक्त होईल, अशी मागणी केली आहे.