शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

शासनाला पश्चिम महाराष्ट्राचा अभ्यास नाही

By admin | Updated: February 15, 2016 23:58 IST

अजित पवार : विसापूर मेळावा; शेतकरी, उद्योजक समाधानी नसल्याचा आरोप

पुसेगाव : ‘राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे; पण या युती शासनाला पश्चिम महाराष्ट्राचा अभ्यास नाही. हे सरकार शेतकरी विरोधातील असल्याने सर्व कामे ठप्प आहेत. शिक्षक, उद्योजक व शेतकरी कोणीही या शासनाकडून समाधानी नाही. आपल्या येथील उद्योजकांना बाजूला सारून परदेशातील उद्योजकांना ‘मेक इन इंडिया’चा नारा देत रेड कारपेट टाकण्याची भाषा सुरू आहे. ग्रामीण भागातील कामगार चळवळ उद्ध्वस्त करण्याचे काम सुरू आहे,’ असा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. दरम्यान, यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसह इतर घटकांचे प्रश्न व न्यायासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरण्यासाठी तयार रहा, असे आवाहनही केले. खटाव तालुक्यातील विसापूर येथे सरपंच सागर साळुंखे यांच्या माध्यमातून व लोकसहभागातून झालेल्या जलसंधारण कामाची पाहणी करण्यासाठी पवार आले होते. त्यावेळी आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, आमदार शशिकांत शिंदे, प्रभाकर घार्गे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, बाळासाहेब सोळस्कर, नितीन भरगुडे-पाटील, प्रदीप विधाते, भाग्यश्री भाग्यवंत आदी उपस्थित होते. माजी उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ‘युती शासनाने राज्यावर पावणे चार हजार कोटी रुपयांचे कर्ज करून ठेवले आहे. माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांना जाऊन एक वर्ष होत नाही तोपर्यंत संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान बंद केले आहे. आमच्या शासनाच्या काळात सुरू असणाऱ्या चांगल्या योजना या शासनाने बाजूला करून बंद केल्या आहेत. राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा बट्याबोळ झाला आहे. जागतिक बाजारात रुपया घसरत चालला असून, डॉलर वाढत आहे. शेजारच्या पाकिस्तानची भूमिका देशाला मारक असून, निष्पापांचा जीव जात आहे. तरी मोदी सरकार गप्प आहे.’ (वार्ताहर)