शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
2
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
3
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
4
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
5
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
6
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
7
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
8
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
9
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
10
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
11
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
12
Operation Sindoor Live Updates: हरियाणात मुसळधार पाऊस, पाहा व्हिडीओ
13
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
14
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
15
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
16
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
17
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
18
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
19
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
20
१० वर्षांच्या प्रवासानंतर, एकमेकांचे झाले, अक्षय-साधनाचा सुंदर क्षण, पाहा भावूक करणारा Video

उसाला एकरकमी एफआरपी अशक्य!

By admin | Updated: November 15, 2015 01:03 IST

कारखानदारांवरच भरोसा : कोंडी कोण फोडणार; केंद्राने साखरेचाही दर निश्चित करण्याची मागणी

संजय कदम ल्ल वाठार स्टेशन गतवर्षी ऊसदराबाबत शांत बसलेली शेतकरी संघटना या हंगामातही हव्यासापोटी शांतच राहिल्याने शेतकऱ्यांच्या उसाचा दर हा कारखानदारांच्या भरोशावरच निश्चित होणार आहे. या हंगामात केंद्राने जाहीर केलेली एफआरपी (किमान आधारभूत किंमत) ही एकरकमी मिळावी हीच शासन व शेतकरी संघटनांची प्रमुख मागणी असली तरी कोणत्याही परिस्थितीत या हंगामात एकरकमी एफआरपी देता येणे शक्य नसल्याची भूमिका कारखानदारांनी स्पष्ट केली आहे. त्यामुळे या हंगामातील उसाची कोंडी कोण फोडणार? याकडे ऊस उत्पादकांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. राज्यात उसाचा गाळप हंगाम स्थिर होऊ लागला असून, गत वर्षाच्या तुलनेत या हंगामात दुष्काळी परिस्थितीचा साखर उत्पादनावर परिणाम जाणवत आहे. या हंगामात उसाचे एकरी उत्पन्न ३० टक्क््यांहून कमी झाले आहे. यामुळे उसाचे क्षेत्र जरी गतवर्षी एवढे दिसत असले तरी साखर उत्पादनात कमालीची घट होणार आहे. या हंगामात सातारा जिल्ह्यात उभा असलेल्या ६७ लाख मे टन उसाचे गाळप होणार असून, जिल्ह्यातील एकूण १३ साखर कारखान्यांनी आपल्या गाळपाची तयारी पूर्ण केली आहे. अजिंक्यतारा, साखरवाडी या कारखान्यांनी प्रत्यक्षात गाळपाचा शुभारंभ केला आहे. उर्वरित सर्वच कारखाने आठवडाभरात आपल्या गाळपाचा शुभारंभ करणार आहेत. उसाच्या गाळप हंगामाचा शुभारंभ आणि या दरम्यान होणारे शेतकरी संघटनांचे आंदोलन हे समीकरणच झाले होते. राज्यात शेतकऱ्यांच्या उसाला रास्त भाव देणारी संघटना म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेवर शेतकऱ्यांचा विश्वास होता. वर्षापूर्वी लोकसभा, विधानसभांच्या निवडणुका लागल्या. यामध्ये ही संघटना सध्याच्या सत्तेत असलेल्या सरकारमधील घटकपक्ष राहिली होती. यामुळे गतवर्षी या संघटनेला या सरकारमधील सत्तेत कुठेतरी स्थान मिळेल, ही आशा राहिल्याने संघटनेने सरकारच्या एफआरपीला महत्त्व दिले. याचीच पुनरावृती या हंगामात झाली. नुकत्याच जयसिंगपूर येथे झालेल्या ऊस परिषदेत या संघटनेने आपली मवाळ भूमिका स्पष्ट केली. यामुळे आता शेतकऱ्यांच्या दराबाबत आवाज कोण उठवणार, असाच प्रश्न निर्माण झाला आहे. एका बाजूने उसाचे क्षेत्र कमी होत असताना या हंगामात वाढती साखर कारखानदारी भविष्यात उसाअभावी संकटात सापडण्याची परिस्थिती दिसत आहे. पुढील हंगामात अनेक भागांतील उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात मोकळे होऊ लागले आहे. यामुळे पुढच्या गाळप हंगामात ऊस उपलब्ध करण्याचे आव्हान अनेक नव्या कारखान्यासमोर राहणार आहे. त्यामुळे या हंगामात जे कारखाने शेतकऱ्यांच्या उसाबाबत योग्य भूमिका बजावतील त्यांनाच हे शेतकरी भविष्यात ऊस देण्याची मानसिकता ठेवतील, अशी परिस्थिती आहे. सध्याच्या हंगामात केंद्राने जाहीर केलेली एफआरपी राज्यातील सर्वच कारखान्यांसाठी बंधनकारक आहे. ही एफआरपी नियमाप्रमाणे एकरकमी देण्याबाबतचा कायदा आहे. त्यामुळे कारखान्यांना या कायद्याप्रमाणे ऊस गाळपानंतर १४ दिवसांत ही रक्कम शेतकऱ्यांना देणे बंधनकारक आहे. शासन व शेतकरी संघटनाही या मुद्द्यशी ठाम असल्यातरी कारखानदारांना ती देणे शक्य आहे का? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. दरापेक्षा ऊस वाळण्याची चिंता या हंगामात जिल्ह्यात उसाचे क्षेत्र गतवर्षी एवढेच असले तरी जिल्ह्यातील अनेक भागांत असलेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे उसाची वाढ झाली नाही. दुष्काळी भागात आता पाणीच नसल्याने शेतकरी ऊसदराची चिंता करण्यापेक्षा असणारा ऊस वाळून जाऊ नये, यासाठी मिळेल त्या कारखान्याला पाठवत आहे.  

साखर कारखानदारीत शासनाच्या एफआरपी धोरणास माझा विरोध नाही; परंतु केंद्र सरकार ज्याप्रमाणे उसाची आधारभूत किंमत निश्चित करते. त्याचप्रमाणे साखरेचा हमी भावाचा निर्णयही केंद्र सरकारने ठरवावा. तरच या गोष्टी शक्य आहेत; अन्यथा कारखानदारांना या परिस्थितीत एफआरपी देणे कदापि शक्य नाही. शेतकऱ्यांच्या उसाला भाव मिळालाच पाहिजे; पण त्यासाठी साखरेचा दरही निश्चित असायला हवा. शासनानेच याबाबत लक्ष द्यावे. - प्रल्हादराव साळुंखे-पाटील, अध्यक्ष न्यू फलटण शुगर वर्क्स साखरवाडी.