शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
4
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
5
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
6
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
7
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
8
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
9
धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
10
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
11
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
12
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
13
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
14
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
15
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
16
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
18
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
19
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
20
Air India Plane Crash Insurance Claim : अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

पोटातील गोळी काढलीच नाही : जादा तपासात साक्षीदार नसल्याचे मान्य-

By admin | Updated: July 17, 2014 23:38 IST

संजय पाटीलखून खटला

सातारा : महाराष्ट्र केसरी संजय पाटील यांचा मृत्यू बंदुकीच्या ज्या गोळीमुळे झाला, ती त्यांच्या पोटातून काढली नाही आणि तिची न्यायवैद्यक चाचणीही केली नाही, अशी माहिती अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी न्यायालयात दिली. दरम्यान, जादा तपासात एकही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्याचे त्यांनी उलटत पासणीत सांगितले.महाराष्ट्र केसरी संजय पाटील खून खटल्याचा फेरतपास करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. याकामी अमोल तांबे यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे त्यांची साक्ष या प्रकरणात महत्त्वपूर्ण असून, आज, गुरुवारी जिल्हा सरकारी वकील विकास पाटील-शिरगावकर यांनी त्यांची सरतपासणी घेतली. त्यानंतर बचाव पक्षाचे अ‍ॅड. धैर्यशील पाटील आणि अ‍ॅड. श्रीकांत जाधव यांनी त्यांची उलटतपासणी घेतली. संजय पाटील यांचा मृत्यू ज्या गोळीमुळे झाला, त्यासंदर्भात तांबे यांच्यावर अ‍ॅड. पाटील आणि अ‍ॅड. जाधव यांनी प्रश्नांची सरबत्ती केली. ‘संजय पाटील यांच्या शरीरातील बंदुकीची गोळी बाहेर काढली का? त्याची न्यायवैद्यक तपासणी केली का?’ या प्रश्नांना तांबे यांनी नकारार्थी उत्तर दिले. त्यावर ‘या गोळीचे पुढे काय झाले? संजय पाटील यांना अग्नी दिल्यानंतर ती वितळली की आणखी काय झाले, याविषयी तुम्ही माहिती घेतली का,’ या प्रश्नालाही तांबे यांनी नकारार्थी उत्तर दिले. ‘संजय पाटील यांची पत्नी आणि भाऊ यांच्या व्यतिरिक्त गावातील आणखी कोणाचे या घटनेसंदर्भात जबाब घेतले का,’ या प्रश्नाला ‘कोणाचेच जबाब घेतले नाहीत,’ असे उत्तर तांबे यांनी दिले. मात्र, गावाबाहेरील लोकांचे जबाब घेतल्याचे त्यांनी नमूद केले. यातील एकही साक्षीदार प्रत्यक्षदर्शी नाही, अशी माहिती त्यांनी दिली. ‘कऱ्हाड येथील शिवाजी रैनाक यांना उदय पाटीलबाबत माहिती देण्यासाठी तुम्ही मारहाण केली होती, अशी तक्रार कऱ्हाड पोलीस ठाण्यात नोंदविली होती का,’ या प्रश्नाचे तांबे यांनी होकारार्थी (पान ४ वर)