शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

रक्ताला जात, धर्म अन् पंत नसतो...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मलटण : ‘रक्ताला जात, धर्म, पंथ नसतो, रक्त गरीब अथवा श्रीमंत नसते, रक्तात असते ती फक्त ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मलटण : ‘रक्ताला जात, धर्म, पंथ नसतो, रक्त गरीब अथवा श्रीमंत नसते, रक्तात असते ती फक्त माणुसकी. रक्त ही अशी एकमेव गोष्ट आहे, जी आपण सहज दान करू शकतो. ‘लोकमत’तर्फे राज्यभर राबवण्यात आलेल्या ‘लोकमत रक्ताचं नातं’ हे शिबिर कौतुकास्पद आहे, अशा उपक्रमात समाजातील सर्व घटकांनी सामील व्हायला हवे,’ असे मत जिल्हा परिषद सदस्या व स्वराज फाउंडेशन अध्यक्षा जिजामाला नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केले.

सुरवडी (ता. फलटण) येथे ‘लोकमत रक्ताचं नातं’ या शिबिरांतर्गत स्वराज फाउंडेशन, ग्रामपंचायत सुरवडी, युवाग्राम संस्था सातारा व मुस्कान फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामस्थांसह युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यावेळी त्या बोलत होत्या.

सर्वप्रथम ‘लोकमत’चे संस्थापक संपादक दिवंगत जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन करून व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

‘रक्त ही अशी एकमेव गोष्ट आहे की, ते कुठेही तयार करता येत नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर रक्ताचा तुटवडा असताना ‘लोकमत’च्या या उपक्रमास सामाजिक संस्थांची साथ मोलाची ठरत आहे,’ असे प्रतिपादन तहसीलदार समीर यादव यांनी केले.

यावेळी फलटण पंचायत समिती सदस्या लता कोळेकर, मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष रमेश आढाव, युवाग्राम संस्थाध्यक्ष गणेश वाघमारे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, गटनेते अशोकराव जाधव, स्वराज पतसंस्था चेअरमन अमरसिंह नाईक-निंबाळकर, सुरवडीचे सरपंच जितेंद्र साळुंखे-पाटील, उपसरपंच दीपक साळुंखे-पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, पोलीस उपनिरीक्षक उस्मान शेख, बजरंग गावडे, अमोल सस्ते, ग्रामसेवक शिवाजी राऊत, नगरसेवक सचिन अहिवळे, डॉ. प्रवीण आगवणे, सुनील जाधव, सिराज शेख, राजेंद्र काकडे, वसंतराव ठोंबरे, शंकरराव दडस, सुधीर करळे, विक्रांत झणझणे, श्रीरंग पवार, सूर्यकांत निंबाळकर, बाळासाहेब जगताप, संदीप सगरे, युवराज पवार, शक्ती भोसले, विशाल नलवडे, किरण जाधव, अलंकार भोईटे, वैभव झणझणे, सुकुमार राणे, आबा शिंदे, सुनील कळसकर, त्रिंबक डोंबाळे, सतीश वावरे, विकास लोखंडे, शिवाजीराव जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संयोजन अमित रणवरे व वसीम इनामदार यांनी केले. ग्रामपंचायत सुरवडी व सर्व सदस्य यांनी मोलाचे सहकार्य केले. शिवानी पावटे यांनी आभार मानले.

150721\img-20210714-wa0161.jpg

सुरवडी येथील रक्तदान शिबिराचे उदघाटन करताना मान्यवर