शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

बाप्पांपुढे दानपेटीऐवजी ज्ञानपेटी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 23:42 IST

प्रगती जाधव-पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : उत्सव काळात धार्मिकतेबरोबरच आधुनिकतेचा ध्यास घेऊन विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी उपयुक्त उपक्रम राबविण्याचा ...

प्रगती जाधव-पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : उत्सव काळात धार्मिकतेबरोबरच आधुनिकतेचा ध्यास घेऊन विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी उपयुक्त उपक्रम राबविण्याचा निश्चय जकातवाडी ग्रामपंचायतीने केला. त्यानुसार दानपेटीऐवजी मंडळांपुढे ज्ञानपेटी ठेवण्याचा अनोखा उपक्रम राबविला. त्याला ग्रामस्थांसह गणेश भक्तांनीही प्रतिसाद दिला.गणरायाच्या दर्शनाला गेल्यानंतर दानपेटीत पैसे स्वरुपात दान करतो. तेच दान आपण विद्यार्थ्यांच्या शालेय उपयोगी वस्तू अथवा पैसे स्वरुपात या ज्ञानपेटीत टाकावे, अशी संकल्पना गावातील गणेशोत्सव मंडळांपुढे मांडण्यात आली. या मंडळांपुढेही पहिल्यांदा आलेल्या या संकल्पनेला उत्साही कार्यकर्त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. सार्वजनिक मंडळांनी बाप्पांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केल्यानंतर समोरील दानपेटीचे रुपांतर ज्ञानपेटीत केले. गणेश दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना मंडाळाच्या कार्यकर्त्यांनी या ज्ञानपेटीविषयी अधिकची माहितीही दिली. भक्तही आपल्या इच्छेने यात पैशांसह शालेय साहित्य दान करत आहेत.गणेशोत्सवानंतर जमा झालेले सर्व शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप जकातवाडी जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांना करण्यात येणार आहे. उत्सव काळात धर्माच्या नावावर निव्वळ उधळपट्टी करणाºया अनेकांसाठी जकातवाडी ग्रामपंचायतीचा उपक्रम अनुकरणीय असाच आहे.ज्ञानपेटीत पेन्सिल,पेन अन् वहीही!जकातवाडीत एकूण १३ गणेशोत्सव मंडळे आहेत. या सर्व मंडळांनी आपल्या मंडळातील दानपेटी काढून तिथे ज्ञानपेटी ठेवली आहे. या ज्ञानपेटीत येणाºया भक्तांकडून पेन, पेन्सिल, वही अशा शोलय उपयोगाच्या वस्तू दान म्हणून देण्यात येत आहेत..जिल्हा परिषद शाळांना मदतज्ञानपेटीत मिळणाºया निधीतून जकातवाडी ग्रामपंचायत हद्दीतील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.