शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

लिफ्ट देणं दुचाकीस्वाराला भोवलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:49 IST

सातारा : रस्त्यावरून जात असताना दोघांना लिफ्ट देणं दुचाकीस्वाराच्या अंगलट आले असून, संबंधित दोघांनी दुचाकीस्वाराला वाटेत थांबवून मारहाण केली, ...

सातारा : रस्त्यावरून जात असताना दोघांना लिफ्ट देणं दुचाकीस्वाराच्या अंगलट आले असून, संबंधित दोघांनी दुचाकीस्वाराला वाटेत थांबवून मारहाण केली, तसेच त्याच्याकडील रोकड आणि मोबाइल चोरून नेला. ही घटना १३ रोजी गणेशवाडी, ता. सातारा गावच्या हद्दीत घडली.

याबाबत अधिक माहिती अशी, विठ्ठल दादासो निकम (वय ४७, रा. दुटाळवाडी, ता. सातारा) हे १३ रोजी रात्री साठेआठच्या सुमारास नागठाणेहून घरी जात होते. यावेळी वाटेत दोन अनोळखींनी त्यांना थांबवले. आम्हाला दुटाळवाडी गावातच यायचे आहे, असे त्यांना सांगितले. त्यामुळे निकम यांनी त्या दोघांना ट्रीपलसिट दुचाकीवर घेतले. काही अंतर पुढे गेल्यानंतर गणेशखिंडीजवळील खडी क्रशरकडे जाणाऱ्या रस्त्यावर त्यांना गाडी थांबविण्यास सांगितली. गाडी थांबल्यानंतर दोन अनोळखी व्यक्तींनी निकम यांना खाली पाडून मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांच्या खिशातील काही पैसे, मोबाइल आणि त्यांची दुचाकी घेऊन चोरट्यांनी पलायन केले. या घटनेनंतर त्यांनी हा घडलेला प्रकार काही नागरिकांना सांगितला. त्यानंतर त्यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात याची माहिती दिली. बोरगाव पोलिसांनी दोन अनोळखी व्यक्तींवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक सागर वाघ करीत आहेत.