शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्राला पाकिस्तानने या तीन टास्क दिलेल्या; भारताविरोधात असे विणले जात होते जाळे...
2
बिटींग रिट्रीट सेरेमनी आजपासून सुरु होणार; पण भारत ना हस्तांदोलन करणार, ना गेट उघडणार...
3
छगन भुजबळ मंत्रिमंडळात परतताच मनोज जरांगे संतापले; अजित पवारांना दिला सूचक इशारा
4
गुगल क्रोममध्ये आढळल्या गंभीर त्रुटी! तुमचा कॉम्प्युटर कधीही होऊ शकतो हॅक; सरकारकडून अलर्ट
5
मुंबईत कोरोनाचे ५३ रुग्ण, महापालिका सतर्क; आपत्कालीन परिस्थितीसाठी रुग्णालये सज्ज 
6
भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये TRF विरुद्ध पुरावे दिले; पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेतली होती
7
Mumbai Weather : वीजा कडाडणार, वादळीवारे सुटणार! हवामान खात्याकडून मुंबईला २१ जूनपर्यंत यलो अलर्ट
8
शपथ घेताच छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “गृहमंत्रालयही सांभाळले आहे, आता...”
9
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
10
स्टेडियममधून पाकिस्तानी खेळाडूंची नावं, फोटो काढून टाकले; 'या' शहरात घेतला गेला निर्णय
11
बाबो! ३ मुलांची आई सासऱ्यासोबत झाली फरार; पतीने जाहीर केलं २० हजारांचं बक्षीस
12
“एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री, जनता अशीच भरडली जाणार, असा काय नाईलाज आहे”
13
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
14
Corona Virus : कोरोना रिटर्न्स! JN.1 व्हेरिएंटचा कहर; 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध, 'या' लोकांना सर्वाधिक धोका
15
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमावरून अक्षय कुमार आणि विकी कौशलमध्ये भांडणं?
16
ट्रम्प यांचा सल्ला कुक यांनी धुडकावला! अ‍ॅपलचा भारतावरच विश्वास; इतक्या कोटींची केली गुंतवणूक
17
शेख हसीना यांच्याविरूद्ध बांगलादेश सरकारची नवी खेळी! आधी पक्षावर बंदी, त्यातच आता...
18
कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय! महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर, देशांत सर्वाधिक रुग्णसंख्या कुठे?
19
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
20
लग्नानंतर ६ महिन्यांतील फक्त २१ दिवस एकत्र होते विरुष्का, अनुष्काचा खुलासा, म्हणाली...

ऊस उत्पादकांना किफायतशीर दर देऊ

By admin | Updated: October 25, 2015 00:19 IST

शिवेंद्रसिंहराजे भोसले : अजिंक्यतारा कारखान्याचा अग्निप्रदीपन समारंभात प्रतिपादन

 सातारा : ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना योग्य व किफायतशीर दर देण्यासाठी कारखान्याचे संचालक मंडळ कटिबद्ध असून, त्यासाठी आवश्यक ती आर्थिक उपाययोजना करण्यात येत आहे,’ असे प्रतिपादन कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. शाहूनगर-शेंद्रे येथे अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर सन २०१५- १६ या ३२ व्या गळित हंगामाचा अग्निप्रदीपन समारंभ आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले व त्यांच्या पत्नी वेदांतिकाराजे भोसले, रुद्रनीलराजे भोसले, कारखान्याचे अध्यक्ष रामचंद्र जगदाळे आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य सतीश चव्हाण, किरण साबळे-पाटील, जितेंद्र सावंत, किशोर ठोकळे, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष रवींद्र कदम, पंचायत समितीच्या सभापती कविता चव्हाण, सदस्य आनंदराव कणसे, जयवंत कुंभार आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, आगामी गळित हंगामात गाळपासाठी एकूण ८१११.०७ हे. आर. ऊसक्षेत्राची नोंद झाली असून, या हंगामात सुमारे सहा लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठरवण्यात आलेले आहे. यंदाच्या गळित हंगामाचा शुभारंभ नोहेंबरच्या पहिल्या आठवड्यात करण्याचे नियोजन संचालक मंडळाने केले आहे. कारखान्याचे कार्यकारी संचालक संजीव देसाई यांनी स्वागत केले. उपाध्यक्ष दिलीप निंबाळकर यांनी प्रास्ताविक व आभार मानले. याप्रसंगी श्री रेणुका शुगर्स लि. चे प्राजेक्ट मॅनेजर बिरादार माजी उपसभापती दादा शेळके, तानाजी तोडकर, जिल्हा खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. सूर्यकांत धनावडे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)