शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

जिलेटिन स्फोटाचा तपास सीबीआयकडे द्या

By admin | Updated: January 19, 2015 00:26 IST

जयकुमार गोरे : शेखरवर कारवाई झालीच पाहिजे; संबंधित पवनचक्की कंपन्यांवर गुन्हा का नाही ?

सातारा : बोथे जिलेटिन स्फोट प्रकरणाचा तपास नि:पक्षपातीपणे होत नसून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास सीबीआय अथवा सीआयडीकडे देण्याची मागणी बोथे ग्रामस्थांच्या वतीने आमदार जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषदेत केली. दरम्यान, प्रजासत्ताकदिनी आम्ही पालकमंत्री विजय शिवतारे यांना निवेदन देणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही ग्रामस्थ भेटणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.आ. गोरे म्हणाले, ‘बोथे येथील स्फोट अवैध जिलेटिन साठ्यामुळे झाला आहे. हा साठा करण्याचा अधिकार, परवाना बोथे विंड मिल अथवा त्याच्या सहयोगी कंपन्याकडे नव्हता. पोलीस अधीक्षकांनाही तसे म्हटल्याचे माझ्या वाचनात आले. हा साठा ज्या कंपन्यांनी केला त्यांनी बोथे येथील लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, या प्रकरणात पहिल्याच दिवशी दाखल झालेली फिर्याद लक्षात घेता पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलेले नाही. तरीही पोलीस तपासात बदल होईल, असा आशावाद होता. मात्र, ज्या ‘कमल एंटरप्रायजेस’ कंपनीवर गुन्हा दाखल केला ती कंपनी येथे काम करत होती का, याची खातरजमाही पोलिसांनी केली नाही.आ. गोरे म्हणाले, ‘कमल एंटरप्रायजेस’ येथे काम करत नाही. तत्कालीन भागीदार अंकुश गोरे यांनी ‘बोथे विंड फार्मा’ आणि ‘स्कायझेन’चे अरविंद बन्सल यांना मी आता येथे काम करत नसल्याचे सांगून आपण येथून पुढे या डोंगरावर बेकायदेशीर काम करू नये, असे पत्राद्वारे कळविले होते. त्याचबरोबर अंकुश गोरे यांनी वकिलामार्फत दुसरे भागीदार शेखर यांना येथे बेकायदेशीर काम करू नये, अशा आशयाची नोटीस दोनवेळा बजावली. यानंतर अंकुश गोरे यांनी ‘कमल एंटरप्रायजेस’मधील भागीदारी संपुष्टात आणली असल्याचे सांगत ठाणे येथील न्यायालयात दावा दाखल केला. या संपूर्ण प्रकाराची माहिती तपास अधिकारी पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना होती. तरीही त्यांनी अंकुश गोरे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. मात्र, हे करत असताना येथे सद्य:स्थितीत काम करणाऱ्या ‘आदित्य’ आणि ‘आर्यन’ या कंपन्यांवर गुन्हा दाखल करण्याची तसदी मात्र घेतली नाही.’ प्रायजेस’ने तर ५५ पवनचक्क्या ‘आदित्य’ आणि ‘आर्यन’ने बसविल्या. मात्र, या दोन कंपन्यांचे नाव कोठे येणार नाही, याची काळजी पोलिसांनी घेतली असल्याचा आरोप करून आ. गोरे म्हणाले, ‘या संपूर्ण प्रकरणात आर्थिक तडजोड असल्याची शक्यता आहे. ‘आर्यन’ कंपनीला कोणी नेमले याचा तपास पोलिसांनी केला का? आणि येथे सुरक्षाव्यवस्था पुरविण्याचे काम कोणाकडे होते, याचा शोध जर पोलिसांनी घेतला तर जिलेटिनचा साठा कोणाचा होता, याचे उत्तर पोलिसांना मिळेल. मात्र, पोलीस तपास करत नाहीत. याप्रकरणात ज्यांचा संबंध नाही, अशा अंकुश गोरे यांना अटक केली. जे सत्य आहे, ते समोर आलेच पाहिजे. यातून कोणी सुटता कामा नये.’ (प्रतिनिधी)वारुगड येथील अवैध साठ्याचे काय झाले?बोथे डोंगरावर ज्यावेळी घटना घडली त्याचवेळी संबंधित कंपनीचा वारुगड येथील कार्यालयात आणखी अवैध जिलेटिन साठा होता आणि तो येथून तत्काळ हलविला असल्याचा आरोप आ. जयकुमार गोरे यांनी केला. गोरे म्हणाले, ‘याची कल्पना मी पोलिसांना दिल्यानंतरही ते येथून वारुगडला जायला तयार झाले नाहीत. त्यांना कारण विचारले तर गाडी नसल्याचे उत्तर त्यांच्याकडून आले. मात्र, तशी परिस्थिती नव्हती. येथे अनेक गाड्या होत्या. तरीही पोलिसांनी त्या ठिकाणी जाण्यास विलंब केला,’ असेही गोरे म्हणाले.मुदगल म्हणतात, लेखी हवे...माण तालुक्यातील बोथे येथील जंगला नामक डोंगरावर घटना घडल्यानंतर पालकमंत्री विजय शिवतारे आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी येथे भेटी दिल्या. या भेटीदरम्यान मीही उपस्थित होतो. आमदार या नात्याने मी पालकमंत्री विजय शिवतारे यांच्याकडे बोथे येथील डोंगरावर सुरू असलेल्या कामकाज, अवैध जिलेटिन साठा याच्या अनुषंगाने तक्रार केली. याचवेळी येथे उपस्थित असणारे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल ‘मला लेखी तक्रार द्या,’ असे सांगतात. मी तालुक्याचा लोकप्रतिनिधी आहे. आमदारांकडेच जर ते लेखी द्या म्हणत असतील तर अवघड आहे, अशी खंतही आमदार गोरे यांनी व्यक्त केली.