शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

साडेचौदा कोटींचा लेखाजोखा द्या!

By admin | Updated: August 12, 2014 23:14 IST

किवळ-खोडजाईवाडी बंधारा : निकृष्ट दर्जाचे काम ग्रामस्थांनी पाडले बंद

मसूर : मागील तीन वर्षांपासून सुरू असलेले किवळ-खोडजाईवाडी बंधाऱ्याचे काम निकृष्ट होत असल्याचे निदर्शनास येताच संतप्त ग्रामस्थांनी ते काम बंद पाडले. प्रारंभी २ कोटी ८५ लाख रूपयांच्या निधीवरून दुप्पट-तिप्पट नव्हे तर तब्बल साडेचौदा कोटी रूपयांची वाढीव तरतूद होऊनही अपूर्ण तसेच निकृष्ट दर्जाचे काम का होत आहे, असा सवाल करून या तलाव्याच्या कामावर नक्की किती खर्च आला? साडेचौदा कोटी रूपयांचे काय काम केले, याचा लेखाजोखा संबंधित विभागाने देण्याची मागणी किवळ येथील सामाजिक कार्यकर्ते प्रदीप साळुंखे यांनी केली.साळुंखे म्हणाले, ‘किवळ भागाने पाण्यासाठी खूप संघर्ष केला आहे. टँकरने पाणी पिण्याची पावसाळ्यातही किवळ गावावर वेळ आली होती. किवळ-खोडजाईवाडीदरम्यान तलाव झाल्यास आसपासच्या विहिरींना, शेतीला पाणी उपलब्ध होईल. या ग्रामस्थांच्या मागणीनुसार शासनाच्या लघुपाटबंधारे विभागाने २ कोटी ८५ लाख रूपये तरतुदीचा मोठा तलाव बांधण्याचे काम गेल्या ३ वर्षांपासून सुरू केले आहे. यासाठी अनेक पदाधिकाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. तथापि अधिकारी-सुपरवायझर यांच्या संगनमताने निकृष्ट दर्जाचे काम सध्या निदर्शनास आले आहे. तलावाच्या साठवणभिंंतीत मातीमिश्रित वाळू व खडीचा वापर अल्प सिमेंटमध्ये करून ग्रीटचा वापर जास्त केला आहे. तलावाची पीचिंगची कामे अद्याप तशीच आहेत. अधिक पाणीसाठा झाल्यास सांडवा केव्हाही फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. २ कोटी ८५ लाखांचे प्रत्यक्षात काम असले तरी दीड कोटीचेही काम झाले नसताना वाढीव साडेचौदा कोटी रूपयांच्या निधीची आणखी तरतूद करण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात किती कोटींचे काम केले, याचे पुरावे संबंधितांनी द्यावेत.’या तलावाचे काम जुन्या तलावाच्या जागीच केले. पूर्वीच्या तलावाच्या मातीचाच वापर केला. माती कमी पडत असल्याचे कारण अधिकाऱ्यांनी पुढे केल्यावर ग्रामपंचायतीने शासनाच्या शेतीशाळेच्या सात एकरातील माती या तलावासाठी दिली. तलावाच्या भराव्यासाठी ही माती नेत असताना मोठे डबरे, खडे तसेच पडून ठेवले असून, तेथे गाळ भरण्याचे काम जाणीवपूर्वक अपूर्ण ठेवले आहे, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. सध्या सात एकर जमीन नापीक, निरूपयोगी झाली आहे. याला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित करतानाच, ही बाब तहसीलदारांच्या निदर्शनास आणून देऊनही त्यांनी दुर्लक्ष झाल्याचा आरोप साळुंखे यांनी केला आहे.यावेळी प्रकाश साळुंखे, सचिन साळुंखे , पै. शिवाजीराव साळुंखे, सागर साळुंखे, संतोष साळुंखे, राजेंद्र साळुंखे, विजय साळुंखे, सुहास साळुंखे यांसह ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)तलावाच्या सांडवा भरावासाठी अल्प सिमेंट आणि मातीमिश्रित वाळू-खडीचा तसेच ग्रीटचा वापर करण्यात आला आहे. संबंधित सुपरवाईझरना काही ग्रामस्थांनी जाब विचारून असे निकृष्ट काम करून भविष्यात हा तलाव टिकणार का, असा सवाल केला. त्यावर ‘हेच प्रमाण अधिकाऱ्यांनी सांगितले आहे,’ असे स्पष्टीकरण सुपरवायझरनी दिले. म्हणजे अधिकारी-कंत्राटदार यांच्या संगनमतानेच हे निकृष्ट काम सुरू आहे.- प्रदीप साळुंखे, सामाजिक कार्यकर्ते, किवळ