शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल ३५ वर्षांनी झाल्या भेटी

By admin | Updated: January 1, 2015 00:15 IST

वडूज : माजी विद्यार्थ्यांचा मेळावा

वडूज : वडूज, ता. खटाव येथील छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये १९७८ साली दहावीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा स्रेह मेळावा उत्साहात पार पडला. १९७८ नंतर तब्बल ३५ वर्षांनी प्रथमच एकत्र भेटलेल्या माजी विद्यार्थी आणि शिक्षकांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.वडूज येथील यशवंत मध्यवर्ती मंगल कार्यालयात या स्रेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. विविध क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या शहरातील काही प्रतिष्ठितांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते. १९७८ साली छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये शिक्षण घेऊन बाहेर पडल्यानंतर यापैकी अनेकजण मुंबई, पुणे, कोल्हापूर, यवतमाळ, सांगली, नाशिक आदी ठिकाणी नोकरी व कामधंद्याच्या निमित्ताने वास्तव्यास गेले होते. त्यामध्ये महसूल विभाग, बँक, परिवहन अधिकारी, शिक्षण तसेच सामाजिक, राजकीय अशा विविध क्षेत्रांत अनेकांनी नावलौकिक कमविला होता. अशा सर्व जुन्या सवंगड्यांना या स्रेह मेळाव्यासाठी बोलविण्यात आले होते. असे सुमारे ४५ विद्यार्थी-विद्यार्थिनी या मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आले होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सेवानिवृत्त शिक्षक व्ही. आर. गोडसे, एस. जे. गोेडसे, एल. जी. गोेडसे, ए. डी. शेख, एच. डी. शेख, जे.के. शिंदे, एस. एच. केंजळे, वसंत फडतरे, पोपट फडतरे यांचा विद्यार्थ्यांनी शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सत्कार केला. यावेळी विद्यार्थ्यांनी १९७८ साली दहावीत आयुष्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावरील शिक्षण घेत असताना शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे जीवनात यशस्वी झाल्याचे सांगितले.यावेळी सुरेश पवार, पांडुरंग काळे, अशोक राऊत, प्रताप राऊत, संभाजीराव खोडे, प्रताप गोेडसे, प्रताप काटकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)