शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

घाट रस्ता खचून मोरी पूल वाहून गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:27 IST

चाफळ : पाटण तालुक्यातील चाफळ विभागाला बुधवारी जोरदार पावसाने झोडपून काढले. या पावसात चाफळमार्गे दाढोली व्हाया पाटण रस्ता दाढोली-महाबळवाडीनजीक ...

चाफळ : पाटण तालुक्यातील चाफळ विभागाला बुधवारी जोरदार पावसाने झोडपून काढले. या पावसात चाफळमार्गे दाढोली व्हाया पाटण रस्ता दाढोली-महाबळवाडीनजीक खचून मोरीपूल वाहून गेल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. पहिल्याच पावसात रस्ता खचल्याने ‘सर आली धावून रस्ता गेला वाहून’ अशी काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. बांधकाम विभागाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी विभागातील ग्रामस्थांनी केली आहे.

चाफळ विभागातून दाढोलीमार्गे पाटणला जोडणारा कमी अंतराचा रस्ता आहे. माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी बांधकाम मंत्री असताना, डोंगर फोडून हा रस्ता तयार केला होता. संपूर्ण घाट रस्ता असणाऱ्या या रस्त्यावर जागोजागी वेडीवाकडी वळणे आहेत. सुमारे दीड वर्षांपूर्वी या रस्त्याची तात्पुरती मलमपट्टी केली होती. ठिकठिकाणी सिमेंटच्या जलवाहिन्या वापरुन मोऱ्यांची कामे करण्यात आली होती. यातील महाबळवाडीजवळील भैरकाटा नावाच्या शिवाराजवळील घाट रस्त्याच्या दुसऱ्या वळणावरील रस्ता खचून मोरीपुलासह जलवाहिन्या वाहून गेल्या आहेत. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा निधी निकृष्ट दर्जाचे काम व मर्जीतील ठेकेदारांना कामे दिली गेल्यानेच पाण्यात गेल्याची संतप्त प्रतिक्रिया येथील ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. दरवर्षी या रस्त्याची दुरवस्था होते.

या संपूर्ण घाट रस्त्याच्या दोन्ही बाजूला नाले काढणे गरजेचे आहे. तसेच ठिकठिकाणी संरक्षक कठड्यांसह आवश्यक त्या ठिकाणी चांगल्या पध्दतीचे मजबूत फरशी पूल बांधणे गरजेचे आहे. दरवर्षी पावसाळ्यात होणारी या रस्त्याची दुरवस्था थांबविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केल्यास निश्चितच ग्रामस्थांची परवड कायमस्वरूपी थांबण्यास मदत होणार आहे. सध्या रस्त्यावर ठिकठिकाणी पावसाचे पाणी वाहिल्याने रस्ता जागोजागी उखडला आहे. भैरकडा येथील मोरीपूल वाहून गेल्याने रस्ता खचला आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे.

चौकट :

सुरक्षेसाठी प्रवास टाळावा

दाढोली महाबळवाडीनजीक भैरकडा येथे बुधवारच्या पावसात रस्ता खचून मोरीपूल वाहून गेला आहे. ठिकठिकाणी रस्ता उखडल्याने मोठी दुरवस्था झाली आहे. बांधकाम विभागाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी. रस्ता खचल्याने वाहतूक पूर्णपणे बंद झाल्याने विभागातील ग्रामस्थ, वाहनचालक यांनी या मार्गावरुन ये-जा करू नये, असे आवाहन दाढोलीचे पोलीसपाटील सचिन डांगे व माजी सरपंच प्रकाश पवार यांनी केले आहे.