शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

पाणी निचऱ्याचे काम तातडीने पूर्ण करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:26 IST

पृथ्वीराज चव्हाण : विटा मार्गावरील पाणीप्रश्न सुटणार कऱ्हाड : कऱ्हाड ते विटा मार्गावर कॅनॉल ते गजानन हौसिंग सोसायटी यादरम्यान ...

पृथ्वीराज चव्हाण : विटा मार्गावरील पाणीप्रश्न सुटणार

कऱ्हाड : कऱ्हाड ते विटा मार्गावर कॅनॉल ते गजानन हौसिंग सोसायटी यादरम्यान पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साचत असते. त्याचा निचरा व्हावा, यासाठी मोठे पाइप टाकण्याचे काम सध्या सुरू आहे. या कामाची पाहणी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. तसेच हे काम त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी महामार्ग विभागाचे उपअभियंता निखिल पानसरे, कऱ्हाड दक्षिण काँग्रेसचे उपाध्यक्ष नानासाहेब जाधव, इंद्रजीत चव्हाण, खादी ग्रामोद्योग तालुकाध्यक्ष शिवाजी जाधव, सैदापूरचे माजी उपसरपंच सचिन पाटील, तानाजी माळी, धनाजी जाधव, सोसायटी अध्यक्ष बाळासाहेब जाधव, दत्तात्रय जाधव, सतीश जाधव आदी यावेळी उपस्थित होते.

पावसाळ्यात जोराच्या पावसामुळे कृष्णा कॅनॉल ते गजानन सोसायटी भागात ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी साचत असल्याने त्याचा वाहतुकीवर मोठा परिणाम होत असतो. शिवाय या भागातील घरांमध्ये पाणी साचून नुकसान होत असते. याबाबत वेळोवेळी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या होत्या. या महामार्गानजीक अण्णा नांगरेनगर हा भाग व आसपासच्या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने याचा निचरा होण्यासाठी जागा नाही. त्यामुळे हे सगळे पाणी महामार्गावर येत असते. यासाठी अधिकाऱ्यांनी या भागाची पाहणी करून निचरा होईल, असे तीन ठिकाणावर मोठे पाइप घालून हे सर्व पाणी मोरीमार्गे ओढ्याला व तेथून नदीला सोडण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. याच कामाची पाहणी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी करून अधिकाऱ्यांकडून कामाच्या प्रगतीची माहिती घेतली.

संबंधित काम त्वरित पूर्ण करावे. हे काम अत्यंत महत्त्वाचे आहे. काम पूर्ण झाल्यावर पावसाळ्यात महामार्गावरील वाहतुकीची होणारी कोंडी व आसपासच्या भागातील घरांचे होणारे नुकसान होणार नाही, यासाठीच हे काम तातडीने व्हावे, अशा सूचनाही माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी दिल्या.

फोटो : १३केआरडी०१

कॅप्शन : कऱ्हाड येथे कॅनॉल ते गजानन हौसिंग सोसायटी यादरम्यान मोठे पाइप टाकण्याचे काम सध्या सुरू आहे. त्याची पाहणी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.