शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
3
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
4
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
5
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
6
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
7
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
8
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
9
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
10
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
11
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
12
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
13
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
14
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
15
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
16
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
17
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
18
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
20
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की

मुलीद्वारे पूजा करण्यास पैशाचे आमिष दाखवणारे गजाआड

By admin | Updated: May 27, 2016 23:11 IST

बारामतीतील घटना : पैशाचा पाऊस पाडण्यास अघोरी कृत्य

बारामती : पैशाचा पाऊस पाडण्यासाठी पूजा करावयाची आहे, असे सांगून एका अल्पवयीन मुलीची मागणी करणारे सहा भोंदू पोलिसांनी गजाआड केले. त्यांच्याविरुद्ध ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट, अघोरी प्रथा, जादूटोणा प्रतिबंधक आणि उच्चाटन अधिनियम २०१३ ’अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बारामती तालुक्यातील तरडोली जवळील धायगुडेवस्ती येथील एका अल्पवयीन मुलीच्या वडिलांना दोन लाख रुपये आणि सोन्याचे आमिष दाखवून पूजेसाठी मुलीची मागणी करण्यात आली होती. त्यासाठी त्यांनी वारंवार चकरा मारून तगदाही लावला. पण वडिलाकडून होकार मिळत नसल्याने आरोपीने तिच्या मामाला गाठले. एक दिवसाची पूजा असून ती अल्पवयीन मुलीच्याच हस्ते करायची आहे, असे सांगून तिच्या अंगावर मुलीद्वारे पूजा; पैशाचे आमिष दाखवणारे गजाआडसात-आठ तोळे दागिणे घालण्याचे आमिष दाखविण्यात आले. पण मुलीच्या मामाला या भामट्यांचा संशय आल्याने त्यांनी इतर नातेवाईकांसह पोलिस ठाणे गाठून तक्रार अर्ज दिला. त्यानुसार पोलिसांनी संबंधित आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतले, पण नुसती चौकशी करून त्यांना सोडून देण्यात आले,दरम्यान, ही बाब अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जिल्हा कार्याध्यक्षा नंदिनी जाधव, जिल्हा सचिव भारत विठ्ठलदास, तालुकाध्यक्ष बाळकृष्ण भापकर, नेताजी खंडागळे यांना समजताच त्यांनी संबंधित मुलीच्या कुटुंबियांची भेट घेतली. घडल्या प्रकारामुळे मुलीचे वडील व कुटूंब खूप घाबरलेले होते. अंनिसच्या पदाधिकाऱ्यांनी शे-दोनशे ग्रामस्थांसह थेट वडगाव निंबाळकर पोलिस ठाणे गाठून गंभीर प्रकार असतानाही गुन्हा का दाखल केला जात नाही, असा जाब विचारला. शेवटी पोलिसांनी मुलीच्या वडिलांची फिर्याद दाखल करून घेत संंबंधित आरोपीविरुद्ध अंधश्रध्दा प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला. नरबळीचा संशय?काही दिवसांपूर्वी दौंड तालुक्यात पैशांचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी पूजा घातल्याचा प्रकार उजेडात आला. त्यानंतर धायगुडेवस्तीतील अल्पवयीन मुलीची मागणी याच कारणासाठी केल्याचे समोर आले. कदाचित, नरबळी देण्यासाठीच मुलीची मागणी करण्यात आली असावी, असा संशय अंनिसच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.या भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखलनाना मारुती कोळेकर (रा. मासाळवाडी, ता. बारामती), दिगंबर बापूराव भापकर, महादेव बाजीराव भापकर, भाऊसाहेब गेणबा सोनवलकर (तिघेही रा. बारामती), पोपट शिवराम नाळे, विकास दादाराम मोहिते (सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.तपासाधिकारी बदलले : या प्रकरणी २४ मे रोजी अर्ज दाखल झालेला असतानाही पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. गुरुवारी गुन्हा दाखल झाल्यावर प्राथमिक तपासाधिकारी सहायक पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्याकडून काढून घेण्यात आला. आता बारामती शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक विजय जाधव हे या प्रकरणाचा तपास करत आहेत.