शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

सराफ दुकानात गॅस सिलिंडरचा स्फोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2015 00:47 IST

शनिवार पेठेतील घटना : फर्निचर, साहित्यांचे नुकसान

सातारा : दागिने वितळविण्याच्या गॅसचा अचानक स्फोट झाल्याने शनिवार पेठेत प्रचंड खळबळ उडाली. स्फोटाच्या आवाजाने घरातील लोक धावत बाहेर आले. या स्फोटामध्ये दुकानातील फर्निचर आणि साहित्याचे नुकसान झाले. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. ही घटना गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली.शनिवार पेठेतील शनी मारुती मंदिराच्या पाठीमागे दुकान गाळे आहेत. यातील एक गाळा दागिने तयार करणाऱ्या कारागिरांनी भाड्याने घेतला आहे. या ठिकाणी सर्व कारागिर दागिने तयार करतात. बुधवारी रात्री नेहमीप्रमाणे दुकान बंद करून कारागिर घरी गेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता ते नेहमीप्रमाणे दुकान उघडत असत. दरम्यान, तत्पूर्वीच सकाळी साडेनऊच्या सुमारास दुकानातील सिलिंडरचा अचानक स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की दुकानाचे शटर उडून बाहेर पडले. मोठा आवाज झाल्याने नागरिकही धावून आले. नेमक काय झालंय, हे कोणालाही समजेनासे झाले होते. काही वेळानंतर दुकानातून आगीच्या ज्वाला बाहेर आल्या. त्यावेळी हा प्रकार नागरिकांच्या लक्षात आला. दुकानात आग लागल्यानंतर नागरिकांनी घरातून पाणी आणून आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. सकाळी दहानंतर हा परिसर लोकांनी गजबजलेला असतो. त्याकाळात स्फोट झाला असता तर अनर्थ झाला असता. (प्रतिनिधी)