शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

जमीन मोजणीची मशीन चोरणारी टोळी जेरबंद

By admin | Updated: January 9, 2017 22:34 IST

पाच युवक अटकेत : एक दिवसाची कोठडी, शिरवळ पोलिसांची कारवाई; कारसह चार लाखांचा मुद्देमाल जप्त

शिरवळ : जमीन मोजणी करण्याचा बहाणा करत जमीन मोजणी मशीनसह पोबारा करणाऱ्या व संबंधित मशीन आॅनलाईनद्वारे परराज्यात विक्री करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा शिरवळ पोलिसांनी पदार्फाश केला. याप्रकरणी पोलिसांनी ५ तरुणांना अटक केली असून, मुख्य सूत्रधारासह दोघेजण फरार आहेत. दरम्यान, संबंधितांना खंडाळा येथील न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.याबाबतची शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पुणे येथील काळेवाडी परिसरामध्ये राहणारे नितीन माने (वय २२), राजकुमार माने (१९ ), मयूर आहेर (१९), सुमित इंगळे (२२, रा. बालेवाडी पुणे), हृषीकेश धहिवाळ (२१, रा. रहाटणी, काळेवाडी, पुणे) व मुख्य सूत्रधारासह दोघेजण खंडाळा तालुक्यात कार भाडेतत्त्वावर घेत होते. तसेच आधुनिक मशीनद्वारे खासगी जमीन मोजणी करून देणाऱ्या मशीन मालकांचे मोबाईल इंटरनेटद्वारे मिळवत त्यांच्याशी ते संपर्क साधत होते. जमीन मोजणी करून देणाऱ्या मालकाशी ते वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून संपर्क करत होते. जमीन मोजणी करणाऱ्या व्यक्तीला पुण्यामधून भाडेतत्त्वावर घेतलेल्या कारमधून सोबत घेत. शिरवळ पोलिस स्टेशनच्या हद्दीत आल्यानंतर ते नाष्टा किंवा जेवण करण्याचा बहाणा करत कारचालकासह हॉटेलमध्ये जात. यानंतर मोठ्या चतुराईने सर्वजण मशीन व कार घेऊन पोबारा करत असे. याप्रकरणी विशाल इतके, दत्तात्रय पोफळे, दाते व ढमाले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरवळ पोलिस ठाण्यात चार गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता शिरवळ पोलिस हे संबंधित टोळीच्या गेल्या काही महिन्यांपासून मागावर होते. शिरवळ पोलिसांनी फलटणचे पोलिस उपविभागीय अधिकारी रमेश चोपडे, पोलिस निरीक्षक संभाजीराव म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाने नितीन माने, राजकुमार माने, मयूर आहेर सुमित इंगळे व हृषीकेश धहिवाळ या पाच जणांच्या आंतरराज्य टोळीला मुदेमालासह जेरबंद केले.पोलिसांनी या प्रकरणात एक कार जप्त केली असून, या प्रकरणात कार मालकाचा मुलगा हृषीकेश धहिवाळ याचाही समावेश आहे. पोलिसांनी कारसह एकूण चार लाखांचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान, संबंधितांची न्यायालयाने सहा दिवसांची पोलिस कोठडी संपल्याने खंडाळा न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने मंगळवार, दि. १० जानेवारीपर्यंत एक दिवसाची कोठडी सुनावली.अधिक तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक पांडुरंग हजारे, पोलिस हवालदार अमोल जगदाळे, स्वप्नील दौंड हे करीत आहे. (प्रतिनिधी)चोरटे उच्चशिक्षित जमीन मोजणीची मशीन चोरून नेणाऱ्या टोळीमधील सर्वजण उच्चशिक्षित आहे. केवळ चैन व एशोआराम करण्यासाठी संबंधितांनी हे गुन्हे केल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. संबंधितांकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता शिरवळ पोलिसांनी व्यक्त केली आहे.