शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेती अवजारे चोरणारी परजिल्ह्यातील टोळी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:44 IST

शिरवळ : नायगाव परिसरात टोमॅटो व्यापारी बनून वावरत शेतकऱ्यांच्या शेतामधील शेती अवजारे चोरून विक्री करणाऱ्या परजिल्ह्यातील टोळीचा शिरवळ पोलिसांनी ...

शिरवळ : नायगाव परिसरात टोमॅटो व्यापारी बनून वावरत शेतकऱ्यांच्या शेतामधील शेती अवजारे चोरून विक्री करणाऱ्या परजिल्ह्यातील टोळीचा शिरवळ पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील चार युवकांना अटक केली. संबंधित युवकांकडून शिरवळ पोलिसांनी चोरीस गेलेले दोन रोटाव्हेटर व गुन्ह्यात वापरलेल्या जीपसह ४ लाख ४५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

सीताराम लक्ष्मण येडगे, उमाजी शिवाजी मदने, ज्ञानेश्वर अनिल जाधव, विशाल रामचंद्र मदने अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नायगाव येथील शेतकरी परमेश्वर दशरथ नेवसे यांच्या मालकीच्या शेतामध्ये ठेवलेला ५५ हजार रुपये किमतीचा रोटाव्हेटर शुक्रवार, दि. १७ तर नायगाव येथील संतोष लक्ष्मण नेवसे यांच्या मालकीचा घरासमोर ठेवलेला ४० हजार रुपये किमतीचा रोटाव्हेटर चोरून नेल्याची फिर्याद शिरवळ पोलीस ठाण्यात दिली होती. यावरून अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, पोलीस निरीक्षक नवनाथ मदने यांच्या सूचनांनुसार शिरवळचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद दीक्षित, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग हजारे, पोलीस अंमलदार जितेंद्र शिंदे, अमोल जगदाळे, स्वप्नील दौंड यांच्या पथकाने तांत्रिक माहिती व सीसीटीव्ही कॅमेरे याचा अभ्यास केला. त्यानंतर रोटाव्हेटर चोरी करणारे सराईत युवक सीताराम लक्ष्मण येडगे (वय २८), उमाजी शिवाजी मदने (२१), ज्ञानेश्वर अनिल जाधव (२२), विशाल रामचंद्र मदने (१९, सर्व, रा. पाणीव, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांनी जीप (क्र. एमएच ४५ एएफ ०५५०) मधून चोरून नेल्याचे तपासात निष्पन्न झाले.

त्यानुसार शिरवळ पोलिसांनी पाणीव या ठिकाणी सापळा रचत संबंधितांच्या मुसक्या आवळत नायगाव परिसरातील चोरून नेलेले दोन रोटाव्हेटर, पिकअप जीपसह ४ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. संबंधित युवकांना पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर खंडाळा येथील न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग हजारे तपास करीत आहेत.

२०शिरवळ

नायगाव या ठिकाणी रोटाव्हेटर चोरणाऱ्या टोळीला अटक केली. (छाया : मुराद पटेल, शिरवळ)