शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गडहिंग्लज पालिकेवर धडक

By admin | Updated: December 23, 2014 23:48 IST

रस्त्यावरील विक्री बंद करा : मंडईतील भाजी विक्रेत्यांचे आंदोलन

गडहिंग्लज : मंडईतील भाजी विक्रेत्यांनी गडहिंग्लज पालिकेवर धडक मारली. लक्ष्मी रोडसह शहरात ठिकठिकाणी रस्त्यावरील भाजी विक्री बंद करावी, अन्यथा शुक्रवार (दि. २६) पासून शहरातील भाजी विक्री बेमुदत बंद करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.विरोधी पक्षनेत्या प्रा. स्वाती कोरी यांच्या नेतृत्वाखालील मंडईतील भाजी विक्रेत्यांनी पालिकेवर धडक मारली. नगराध्यक्षा लक्ष्मी घुगरे व उपनगराध्यक्षा कावेरी चौगुले यांच्यासमोर आपली व्यथा मांडली आणि निवेदन दिले.निवेदनात म्हटले आहे की, लक्ष्मी रोडवरील भाजी विक्रेत्यांना भडगाव रोडवरील मंडईत हलविण्यात आले. त्यावेळी लक्ष्मी रोडवरील भाजी विक्री बंद करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते.दरम्यान, काही व्यापारी व शेतकरी लक्ष्मी रोडसह शहरातील ठिकठिकाणी दुकान थाटून भाजी विक्री करीत आहेत. त्यामुळे मंडईतील भाजी विक्रेत्यांचे नुकसान होत आहे. याबाबत तोंडी व लेखी अनेकदा कळवूनही त्याकडे पालिकेने दुर्लक्ष केले आहे.दोन दिवसांत मंडईबाहेरील शहरातील भाजी विक्री बंद न केल्यास व्यवसाय बंद ठेवून सनदशीर मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.शिष्टमंडळात अमोल हातरोटे, शेखर चिंचेवाडी, मुस्ताक खलिफ, सदाशिव अळगुंडे, सूरज चौगुले, राहुल नेवडे, लीलाबाई देसाई, विमल दळवी, शोभा कांबळे, शिवानंद जिनगी, लता चौगुले, मल्लाप्पा चनबसण्णावर, अमर नेवडे, आप्पासाहेब खानाई, आदींसह भाजी विक्रेत्यांचा समावेश होता. (प्रतिनिधी)दोन दिवसांत कारवाईमंडईबाहेर भाजी विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाईसाठी नगरपालिकेचे खास पथक नेमण्यात येईल, अशी ग्वाही नगराध्यक्षा लक्ष्मी घुगरे यांनी भाजी विक्रेत्यांच्या शिष्टमंडळाला यावेळी दिली.