शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

वय विसरून सखी खेळल्या ‘फनी गेम्स’

By admin | Updated: March 16, 2016 08:25 IST

डबल धम्माका : संगतीला सुमधूर गीतांची मैफल; ‘शांताबाई...’ गाण्यांने आणली धम्माल

सातारा : खचाखच भरलेले शाहू कला मंदिर, हिंदी-मराठी जुन्या गाण्यांनी मन प्रसन्न झालेले अन् संगतीला मजेशीर खेळ. त्यामुळे सखींसाठी रविवारचा दिवस म्हणजे डबल धम्माकाच ठरला. अगदी वय विसरून अनेक सखी मजेशीर खेळात रमून गेल्या होत्या. ‘लोकमत सखी मंच’च्या वतीने सातारा येथील सखीमंच २०१६ च्या सभासदांना या वर्षातील पहिलाच ‘डबल धम्माल’ हा कार्यक्रम रविवारी आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन ‘लोकमत’चे संस्थापक संपादक व थोर स्वातंत्र्यसेनानी दिवंगत जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. सखीमंच कार्यकारणी सदस्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी सर्व कलाकार उपस्थित होते.चैताली माजगावकर-भंडारी यांनी मजेशीर खेळ घेतले होते. यामध्ये चहाचे थ्रमॉकॉलचे कप एकात एक ठेवत मनोरा लावणे. हे करत असताना समतोल सावरताना अनेकांना कठीण झाले होते. जिच्या मनाची एकाग्रता तीच ठरू शकते विजेती, हे या खेळाने दाखवून दिले. तोंड आणि हात, पायाला कागदाच्या पट्ट्यांनी बांधलं खरं; पण या खेळाने सखींची करमणूक करण्याबरोबरच विचार करायलाही लावला. शिटी वाजवणे, सर्वात जास्त बांगड्या, फुगे घेऊन नृत्य, बसून फुगे फोडणे, पर्समध्ये मिस्टरांचा फोटो, एक हजारांची नोट, सगळ्यात सुंदर सही, खराब सही, पेज लाईक केल्यावर आॅनलाईन लकी ड्रॉ यासारख्या खेळांना विशेष पसंती मिळाली. कार्यक्रमात खरी रंगत आणली ती मृदुला मोघे यांच्या सुमधूर गाण्यांनी. ‘पिंगा...’ या गाण्यांनी अनेक सखींनी व्यासपीठावर येऊन पिंगाचा फेर धरला. ‘शांताबाई...’ या गाण्यावर तर महिला मनसोक्त थिरकल्या. दरवेळी प्रमाणेच लावणी हाच आमचा विक पॉइंट असल्याचे सखींनी यंदाही दाखवून दिले. शिट्ट्या वाजवून लावण्यांना दाद दिली.विनोदी शैलीतून सादर केलेले विनोदी किस्स्यांनी पोट धरून हसायला लावले. लहान मोठ्या खेळांमधून सखींनी बक्षिसांची लयलूट केली. (प्रतिनिधी)सभासद होण्याची शेवटची संधी!ज्या महिलांनी अजूनही सखीमंच सभासद नोंदणी केली नाही. त्यांच्यासाठी शेवटचे काही दिवस सभासद नोंदणी चालू आहे. सखींच्या आग्रहावरून रविवार, दि. २० मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यांनी आपल्या मैत्रिणीस सभासद केल्यास त्यांनाही सरप्राईज गिफ्ट मिळवता येणार आहे. त्याच प्रमाणे सखींची सर्वाधिक पसंती मिळत असलेला ‘लावणी शो’ लवकरच आयोजित केला जाणार आहे.