शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

गावाच्या मध्यावरच होतात अंत्यसंस्कार

By admin | Updated: October 21, 2014 23:46 IST

बोर्गेवाडी, भैरेवाडीची स्थिती : शाळेनजीकच अंत्यविधी होत असल्याने मुलांमध्ये भीती

चाफळ : डेरवण-चाफळ, ता. पाटण ग्रामपंचायतीअंतर्गत असलेल्या बोर्गेवाडी व भैरेवाडी या गावांना स्मशानभूमी शेड नाहीत. डेरवणला स्मशानभूमी शेड आहे; पण तेथे जाण्यासाठी रस्ता नाही. बोर्गेवाडी गावाच्या मध्याहून वाहणाऱ्या ओढ्याच्या काठावरच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेपासून शंभर मीटर अंतरावर ग्रामस्थांना मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. भैरेवाडीचीही तशीच काहीशी अवस्था आहे. वारंवार मागणी करूनही संबंधित विभाग त्याकडे दुर्लक्ष करत आहे. पाटण तालुक्यातील डेरवण ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या बोर्गेवाडी गावची लोकसंख्या ६०० च्या आसपास आहे. तर भैरेवाडी गावची लोकसंख्या ४०० च्या आसपास आहे. या दोन्ही गावातील बहुतांश तरुण नोकरीच्या निमीत्ताने परगावी वास्तव्यास आहेत. त्यांचे चार-सहा महिन्यांतून गावी कधीतरी येणे-जाणे असते. या दोन्ही गावांना स्मशानभूमी शेड नाहीत. दोन्ही गावांना राजकीय वारसा लाभलेला आहे. तरीही येथील राजकीय मंडळींना स्मशानभूमी शेडचा प्रश्न सोडविता आलेला नाही. बोर्गेवाडी गावात प्रवेश करताच प्रथम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लागते. शाळेपासून अगदी हाकेच्या अंतरावरच स्मशानभूमी आहे. येथे उघड्यावरच अंत्यसंस्कार केले जात असल्याने त्याचा त्रास शाळेतील विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. अनेकदा मुले शाळेत जाण्यास घाबरत आहेत. स्मशानभूमीच्या आजूबाजूला घरे आहेत. तेथील ग्रामस्थांनाही याचा त्रास होत आहे. बोर्गेवाडी, भैरेवाडी गावांना स्मशानभूमी आहे. परंतु येथे शेड नाही. विघूत खांब आहे; पण त्यावर दिवे नाहीत. अंत्यविधी करण्यास पै पाहुणे येथे येतात. मात्र त्यांना उभे राहण्यास स्वतंत्र शेड नाही. परिणामी पावसाळ्यांत ग्रामस्थांना रात्रभर जागून अंत्यसंस्कार करावे लागतात. अनेकदा रॉकेल बत्ती अथवा कंदीलाचा आधार घेऊन रात्रभर येथे थांबावे लागते. वास्तविक, ही दोन्ही गावे महसूली असल्याने ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दिलेले सौरऊर्जेचे दिवे तरी येथे देणे आवश्यक होते, मात्र तसे झालेले नाही.परिणामी याचा सर्वाधिक फटका दोन्ही गावच्या ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. (वार्ताहर)गावाला स्मशानभूमी शेड नाही. त्यामुळे उघड्यावरच ओढ्याच्या काठावर अंत्यसंस्कार करावे लागतात. शालेय मुलांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे. याठिकाणी शेड नसल्याने पावसाळ्यात रात्रीच्या वेळी बॅटरी अथवा कंदील,रॉकेल बत्तीचा आधार घ्यावा लागतो. ग्रामपंचायतीचेही याकडे अक्षम्य दुर्लक्ष आहे. - नामदेव मोरे (बोर्गेवाडी)