शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

चिमणराव कदम यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

By admin | Updated: December 14, 2014 23:46 IST

अंत्यदर्शनासाठी गर्दी : फलटण तालुक्यासह जिल्ह्यातून कार्यकर्त्यांची उपस्थिती

फलटण : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, फलटण-खंडाळ्याचे माजी आमदार सूर्याजीराव शंकरराव कदम तथा चिमणराव कदम यांचे मुंबईत निधन झाल्यानंतर रविवारी सकाळी अकरा वाजता त्यांचे पार्थिव येथे आणण्यात आले. त्यावेळी फलटण शहर व तालुक्यातील आबालवृद्धांनी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती. दरम्यान, सायंकाळी पाचच्या सुमारास गिरवी या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. आजारी असल्याने वैद्यकीय उपचारासाठी मुंबईतील ब्रीच कॅण्डी हॉस्पिटल येथे त्यांना दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना शनिवारी सायंकाळी ६.३० वाजता त्यांचे निधन झाले. पार्थिव रविवारी सकाळी येथे पोहोचल्यानंतर त्यांच्या निवासस्थानी काही वेळ ठेवण्यात आले. निवासस्थानासमोर खास उभारण्यात आलेल्या शामियान्यात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. त्यावेळी माजी आमदार डॉ. कृष्णचंद्र भोईटे, माजी मंत्री, आ. डॉ. पतंगराव कदम, विलासराव पाटील-उंडाळकर, जयसिंगराव पाटील-उंडाळकर, शंकरराव गाढवे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत, सुभाषराव शिंदे, रघुनाथराजे नाईक-निंंबाळकर, अध्यक्ष सुभाषराव सूर्यवंशी-बेडके, माजी आमदार मदन भोसले, राजनशेठ चिपळूणकर, प्रल्हादराव साळुंखे-पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, सभापती अमित कदम, कृषी सभापती शिवाजीराव शिंदे, नितीन भरगुडे-पाटील, जिल्हा परिषद सदस्य आनंदराव शेळके-पाटील, धैर्यशील ऊर्फ दत्ता अनपट, सुनीता गायकवाड, बाळासाहेब कासार, अशोकशेठ सस्ते, पंचायत समिती सभापती स्मिता सांगळे, उपसभापती पुष्पा सस्ते, यांच्यांसह संस्थांचे पदाधिकारी, राजकीय कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी अंत्यदर्शन घेतले.दरम्यान, दुपारी कदम यांचे पार्थिव गिरवी या त्यांच्या गावी नेण्यात आले. त्यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार जयकुमार गोरे, आमदार आनंदराव पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष लक्ष्मणराव पाटील, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी अंत्यदर्शन घेतले. सायंकाळी चारच्या सुमारास अंत्ययात्रेला सुरुवात झाली. सायंकाळी पाचच्या सुमारास कृषी महाविद्यालयाच्या आवारात पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. (प्रतिनिधी) कुटुंबीयांचे सांत्वन...अंत्यदर्शन घेण्याबरोबरच प्रत्येकाने चिमणराव कदम यांच्या पत्नी शारदादेवी कदम आणि कदम कुटुंबीयांचे सांत्वन केले. पत्नी व कदम कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी असलेल्या कार्यकर्त्यांच्या भावनाही त्यांना अनावर होत होत्या. त्यामुळे त्यांची अवस्थाही आभाळ कोसळल्यासारखी झाली होती.