शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

स्वखर्चाने पुसेगाव गणात मोफत पाणीपुरवठा

By admin | Updated: April 11, 2017 16:09 IST

सामाजिक बांधिलकी : टंचाईमुळे गावे, वाड्यावस्त्यांना पाण्याची झळ

आॅनलाईन लोकमतपुसेगाव (जि. सातारा), दि. ११ : पुसेगाव भागात सध्या पाणीटंचाई वाढू लागली आहे. अनेक वाड्यावस्त्या तसेच गावांना पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवू लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुसेगाव येथील कार्यकर्ते माजी उपसरपंच संतोष उर्फ बाळासाहेब जाधव आणि सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त सुरेशशेठ जाधव यांच्यातर्फे पुसेगाव गणातील पाणीटंचाई असलेल्या विविध गावांना स्वखर्चाने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. येथील छत्रपती शिवाजी चौकात आमदार शशिकांत शिंदे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या उपक्रमाला प्रारंभ करण्यात आला. दोन्ही जाधव यांच्या दातृत्वाचे आमदार शिंदे यांनी कौतूक करुन पाणी पुरवण्याचा उपक्रम इतरांनाही प्रेरणादायी असल्याचे नमुद केले. अन्य भागातील कार्यकर्त्यांनीही अशा उपक्रमांसाठी पुढे यावे असे आवाहन केले.यावेळी उपसभापती कैलास घाडगे, जिल्हा परिषद सदस्य प्रदिप विधाते, पंचायत समिती सदस्य संतोष साळुंखे, राजेंद्र कचरे, जगनशेठ जाधव, हिंदूराव देशमुख, मनोज जाधव, गणेश जाधव, सुसेन जाधव, अ‍ॅड. विजयराव जाधव, मोहन जाधव, बाळासाहेब जाधव, अशोकराव जाधव, सदाशिव जाधव, शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रताप जाधव, सुश्रूत जाधव, आकाश जाधव, राजेंद्र जाधव, राजेंद्र गाडे, वैभव गायकवाड, अभिजीत फडतरे, चंद्रकांत जाधव, प्रदीप जाधव उपस्थित होते. यावर्षी खटाव तालुक्यातील अनेक गावांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आमदार शशिकांत शिंदे यांच्या प्रोत्साहानामुळे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाच्या प्रेरणेमुळे आपण हा समाजोपयोगी उपक्रम स्वखचार्ने राबवत असल्याचे बाळासाहेब जाधव व सुरेशशेठ जाधव यांनी सांगितले. या उपकमांतर्गत बारा हजार लिटर क्षमतेच्या टँकरद्वारे पाणीटंचाई असलेल्या पुसेगाव गणातील गावांना मोफत पाणीपुरवठा करण्यात येत आहे. ज्या गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे अशा गावांनी संपर्क साधाव असे आवाहन त्यांनी केले. (वार्ताहर)