शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

चार नगराध्यक्ष बिनविरोध

By admin | Updated: July 10, 2014 00:35 IST

राजकारण तापले : सातारा, फलटण, म्हसवड, रहिमतपूरमध्ये एकच अर्ज

सातारा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या नगराध्यक्ष निवडीमुळे जिल्ह्यातील राजकारण भलतेच तापले आहे. सातारा, फलटण, म्हसवड व रहिमतपूरमध्ये नगराध्यक्षपद बिनविरोध करण्यात स्थानिक नेत्यांना यश मिळाले आहे, तर वाई, पाचगणी, महाबळेश्वर, कऱ्हाड पालिकांच्या नगराध्यक्ष निवडीत एकापेक्षा जास्त अर्ज दाखल झाल्याने चुरस निर्माण झाली आहे. नगराध्यक्षपदाचे आरक्षण बदलले असल्याने या निवडी कराव्या लागल्या आहेत. सचिन सारस (सातारा), उज्ज्वला माने (रहिमतपूर), विजय सिन्हा (म्हसवड), सारिका जाधव (फलटण) यांचा त्या-त्या ठिकाणी एकमेव अर्ज दाखल झाला असल्याने त्यांची नगराध्यक्षपदावरील निवड निश्चित झाली आहे. याउलट कऱ्हाडमध्ये सत्ताधारी लोकशाही आघाडीच्या विद्याराणी साळुंखे व विरोधी जनशक्ती आघाडीच्या अरुणा शिंदे यांचे अर्ज दाखल झाले. महाबळेश्वरमधून लोकमित्र जनसेवा आघाडीच्या सुनीता आखाडे, तर आमदार मकरंद पाटील यांच्या गटातून उज्ज्वला तोष्णिवाल यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. पाचगणीतून विद्यमान नगराध्यक्षा लक्ष्मी कऱ्हाडकर, विरोधी गटातील महेश चौरासिया व उज्ज्वला महाडिक यांनी अर्ज भरले आहेत. वाईतून जनकल्याण आघाडीचे नंदकुमार खामकर, शोभा शिंदे, तीर्थक्षेत्र आघाडीचे भूषण गायकवाड या तिघांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केले आहेत. कऱ्हाडमधून आमदार बाळासाहेब पाटील विरोधातील जाधव गटाने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे, तर वाई-महाबळेश्वर-पाचगणीची सत्ता खेचण्यासाठी आमदार मकरंद पाटील यांनी तयारी केली आहे. या निवडीमुळे कऱ्हाड तसेच वाई मतदारसंघांतील राजकारण तापले आहे. (प्रतिनिधी)