शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

अडीच तोळ्यांचे सापडलेले गंठण केले परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:40 IST

चाफळ : खासगी प्रवासी गाडीत एका महिलेचे गहाळ झालेले अडीच तोळ्यांचे गंठण सापडल्यानंतर ते प्रामाणिपणे महिलेस परत करणाऱ्या ...

चाफळ :

खासगी प्रवासी गाडीत एका महिलेचे गहाळ झालेले अडीच तोळ्यांचे गंठण सापडल्यानंतर ते प्रामाणिपणे महिलेस परत करणाऱ्या चाफळ येथील अनिल साळुंखे व धोंडिराम हिंदोळे या दोघांचे कौतुक होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी सकाळी ११ वाजता माया संजय पवार (रा. काशीळ व शिल्पा वास्के रा. केसे पाडळी) या दोन बहिणी वाघजाईवाडी येथे राहत असलेल्या भावाकडे यात्रेसाठी आल्या होत्या. यात्रा झाल्यानंतर त्या आपल्या गावी जाण्यासाठी चाफळ येथील एसटी बसस्थानकात आल्या होत्या. बराच वेळ थांबूनही एसटी बस नसल्याचे पाहून व जवळ असलेले बाळ रडत असल्याने त्यांनी चाफळ येथील अनिल साळुंखे यांच्या खासगी वाहनातून उंब्रजपर्यंत प्रवास केला. यादरम्यान त्यांचे सोन्याचे अडीच तोळ्याचे गंठण गाडीच्या मागील सीटवर पडले होते. साळुंखे यांच्या ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी ही प्रथम बाब चाफळ येथील पोलीस दूरक्षेत्राचे सुशांत शिंदे यांना सांगितली. शिंदे व साळुंखे यांनी चाफळ बाजारपेठेतील धोंडिराम हिंदोळे यांच्या मदतीने मोबाइलवरून सर्व ग्रुपवर संपर्क साधत मेसेज करून ओळख पटवून गंठण घेऊन जाण्याचे‌ आवाहन केले. दोन तासांनंतर महिला आपल्या घरी गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की आपल्या गळ्यातील गंठण पडले आहे. त्यानंतर या बहिणींनी वाघजाईवाडी येथील भावास फोन करून गंठण पडल्याचे सांगितले. यावेळी भावाने चाफळ येथे येऊन विचारपूस करण्यास सुरुवात असता हे गंठण चाफळ येथील अनिल साळुंखे यांना सापडले असल्याचे समजले असता त्यांनी त्यांची समक्ष गाठ घेऊन आपल्या बहिणीचे गंठण असल्याचे अनिल साळुंखे यांना सांगितले व ओळख पटल्यानंतर हे गंठण त्या महिलेस धोंडिराम हिंदोळे, विकास हिंदोळे यांच्या उपस्थितीत देण्यात आले.