शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

सिमेंटच्या जंगलातही खुणावतोय सह्याद्रीतील रानमेवा !

By admin | Updated: April 10, 2017 14:22 IST

दहा रुपये मापटं : कास, जावळीतील दुर्गम भागातून काळीमैना साताऱ्याच्या बाजारात

आॅनलाईन लोकमतपेट्री, जि. सातारा, दि. १0 : शाळांना सुट्या लागल्यानंतर झाडांवर चढणं, काळीमैना, जांभळं, आंबुळगी, तोरणं असलं रानमेवा खाणं खेड्यांतील मुलांना सहज शक्य आहे. पण शहरी संस्कृतीत ते हद्दपार होऊ लागले आहे. सातारा, जावळी तालुक्यांतील दुर्गम भागातील शेतकरी रानमेवा साताऱ्याच्या बाजारात विक्रीसाठी आणत आहेत. त्यामुळे सिमेंटच्या जंगलातील मुलांची हौस फिटत आहे.जिल्ह्याच्या पश्चिम भागात रानमेवा मुबलक प्रमाणात उपलब्ध होऊ लागला आहे. या रानमेव्याचा आस्वाद पर्यटकांबरोबरच सातारा, महाबळेश्वरसारख्या बाजारपेठेत येणारेही घेऊ लागले आहेत. त्यामुळे स्थानिकांनाही रोजगार मिळू लागला आहे.जिल्ह्याच्या पश्चिम भागातील डोंगररांगामध्ये पाटण, सातारा, जावळी , महाबळेश्वर तालुक्यांच्या पश्चिम घाटमाथ्यावर तोरणे, आंबुळगी, करवंदे, आळू, जांभूळ, फणस, आंबा हा डोंगरातील रानमेवा दरवर्षीप्रमाणे मार्च महिन्यापासून मे-जूनपर्यंत मुबलक प्रमाणात उपलब्ध होत असतो. हा रानमेवा बाजारपेठेत पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे. परिसरात फिरावयास येणारे अनेक पर्यटक या रानमेव्याचा आस्वाद घेताना दिसत आहेत. वेली, झुडपात येणारे आंबुळगी हे फळ फेब्रुवारी, मार्चमध्ये पिकण्यास सुरुवात होते. त्यानंतर तोरणे, जांभूळ, आळू, करवंदे, फणस व आंबे या पिकांचा क्रमाने हंगाम सुरू होतो. तोरणे हे काटेरी झुडपाला येणारे एक बीज वर्गीय फळही पिकण्यास सुरुवात झाली आहे. हे फळ पांढऱ्या रंगाचे असूून, चवीला गोड व साधारण तुरट असते. फळांचा आकार लहान मण्याएवढा असतो. तसेच अनेक ठिकाणी कच्ची करवंदे व जांभळे तयार झाली आहेत. काही ठिकाणी करवंदे पिकण्यास सुरुवात झाली आहे.पाटण तालुक्याच्या कोयनानगर, हेळवाक, नवजा तसेच सातारा तालुक्यातील ठोसेघर, परळी भाग, जावळी तालुक्यातील कास-बामणोली व महाबळेश्वर तालुक्याचा तापोळा, प्रतापगड या विभागातील हजारो शेतकरी आंबुळगी, तोरणे, करवंदे, जांभूळ यांच्या पाट्या भरून डोक्यावरून सातारा शहर व परिसरातील बाजारपेठेत विकतात. पावसाळ्यासाठीचा बाजारहाट खरेदी करतात. सततचे आभाळ तसेच वातावरणातील तीव्र उष्णता यामुळे झाडांना आलेला मोहोर जळून जाणे, तसेच मोहोर जास्त प्रमाणात गळून गेल्याने गतवषीर्पेक्षा यंदा रानमेवा असलेल्या फळांचे प्रमाण कमी आहे.