शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

भूस्खलनाचा महापूर गावाला गेला चक्क खेटून!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:35 IST

सातारा : गावकरी गाढ झोपेत असताना उशाला असलेला अख्खा डोंगर कोसळला अन् भूस्खलनाचा महापूर धडाडत खाली आला. पण गावावर ...

सातारा : गावकरी गाढ झोपेत असताना उशाला असलेला अख्खा डोंगर कोसळला अन् भूस्खलनाचा महापूर धडाडत खाली आला. पण गावावर न येता गावाला अगदी खेटून हा महापूर गावापासून दूरवर गेला. सकाळी झाेपेतून उठल्यानंतर हे विदारक दृश्य पाहून गावकऱ्यांच्या काळजाचा अक्षरश: ठोका चुकला. हा भूस्खलनाचा महापूर गावावर आला असता तर काय झाले असते, या विचारानेच गावकरी अक्षरश: हादरून गेलेत.

सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यामध्ये भूस्खलनाच्या घटना यंदा सर्वाधिक घडल्यात. आंबेघर, मीरगाव, ढोकावळे या गावांना भूस्खलनाचा जबर फटका बसलाय. आंबेघरमध्ये १५ जणांचा जीव गेलाय. या घटनांनी समाजमन पुरते हबकून गेले असतानाच पाटण तालुक्यातच आणखी एक मनाला हादरून सोडणारी घटना समोर आली आहे. डोंगराच्या पायथ्याला वसलेल्या व सत्तर घरांचा उंबरठा असलेल्या जुगाईवाडीतील ही घटना आहे. गावकरी गाढ झोपेत असताना पहाटे चारच्या सुमारास

जुगाईवाडीच्या अख्खा डोंगराचे भूस्खलन झाले. दगड, झाडे उन्मळून पडून भूस्खलनाचा महापूर आला. गावाला खेटून हा महापूर गावकऱ्यांची भातशेती उद्‌ध्वस्त करून गावापासून दूरवर निघून गेला. काही गावकरी सकाळी झोपतून उठल्यानंतर त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. हे भीषण वास्तव पाहून गावकरी हबकून गेले. आंबेघरची परिस्थिती क्षणात त्यांच्या डोळ्यांसमोर तरळली. हा भूस्खलनाचा महापूर गावावर कोसळला असता तर होत्याचं नव्हतं झालं असतं. असं गावकरीबोलू लागले. या प्रकारानंतर गावकऱ्यांनी स्थानिक प्रशासनाला याची माहिती दिली. नोकरीनिमित्त मुंबई, पुण्याला असलेल्या आपल्या मुलांनाही या भीषण दुर्घटनेची कल्पना दिली. त्या काळरात्री गावावर ओढावलेलं संकट टळल्याने गावकरी आनंदित आहेत. पण काबाडकष्ट करून तयार केलेली भातशेती या भूस्खलनात गायब झाली. त्यामुळे गावकरी चिंताग्रस्तही आहेत.

चाैकट :

आता भविष्याची चिंता..

या दुर्दैवी घटनेने गावकऱ्यांची झोप उडाली आहे. डोंगर पुन्हा कोसळणार तर नाही ना, या विचाराने अनेकजण भयभीत झाले आहेत. प्रशासनाने या गावाचा नुकसानीचा पंचनामा केला आहे. आता भातशेतीची भरपाईसुद्धा मिळेल. पण गावच्या पुनर्वसनाचा प्रश्न गावकऱ्यांना भेडसावू लागला आहे. सर्वांना मृत्यूने एखदा हुलकावणी दिली आहे; पण भविष्यात पुढे काय वाढून ठेवले आहे, या विचाराने गावकरी चिंताग्रस्त आहेत.

फोटो : ३१ पाटण फोटो