शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल आठ क्रीडा प्रकारांमध्ये झेंडा

By admin | Updated: June 27, 2016 00:39 IST

मोबाईल आॅफ कॉम्प्युटर आॅन : पाचवडची तिरंगा स्कूलचा उपक्रम , अशी ही जगावेगळी शाळा

राहुल तांबोळी--भुर्इंज पास होण्यासाठी आवश्यक गुण तर घोकमपट्टी करूनही मिळतात; पण आयुष्याच्या परीक्षेत पास होण्यासाठी तो शारीरिक तंदुरुस्त असणे आवश्यक आहे. हीच बाब ओळखून पाचवड येथील तिरंगा इंग्लिश मीडियम स्कूलने क्रीडा क्षेत्राकडे विशेष लक्ष वेधले आहे. या शाळेत कराटे, आर्चरी, हॅण्डबॉल, फुटबॉल, व्हॉलिबॉल, खो-खो, क्रिकेट, कबड्डी अशा विविध खेळांच्या प्रशिक्षणाची परिपूर्ण सोय आहे. पाचवड येथील तिरंगा एक्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मीडियम स्कूलने शाळेत अनेक उपक्रम राबवून वेगळेपण टिकवून ठेवले आहे. शाळेच्या क्रिकेट टीमने नुकताच राज्यपातळीवर प्रथम क्रमांक पटकावला असून, हॅण्डबॉलच्या विभागीय संघात शाळेच्या विद्यार्थ्याची निवड झाली आहे. आर्चरी खेळात या शाळेचे विद्यार्थी राज्य पातळीवर खेळत आहेत. कराटेमध्ये देशपातळीवर पदकांची लयलूट शाळेच्या विद्यार्थ्यांनी केलीच आहे. शिवाय आंतराष्ट्रीय आशियाई स्पर्धेत तब्बल ६ पदकांवर या विद्यार्थ्यांनी तिरंगाचे नाव कोरले आहे. या शाळेचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे संस्थेत प्रवेशावेळी कोणत्याही प्रकारची देणगी घेतली जात नाही. ‘नो डोनेशन; बट बेस्ट एज्युकेशन’ या ध्येयाने वाटचाल करणारी ही संस्था दुर्मीळ आणि म्हणूनच दखलपात्र ठरते. संस्थेच्या अध्यक्षा पुष्पलता गायकवाड, संस्थेचे सचिव तथा चिंधवलीचे माजी सरपंच जयवंत पवार, प्रिन्सिपल वनिता पवार, मुख्याध्यापिका वैशाली कुंभार यांच्या काटेकोर देखरेखीखाली संस्थेचा विस्तार होत आहे. सचिव जयवंत पवार यांनी नोकरी महोत्सवाचे आयोजन केले होते. मोबाईल आॅफ; कॉम्प्युटर आॅनशाळेत आल्यानंतर सर्वच्या सर्व शिक्षकांचे मोबाईल फोन स्वीच आॅफ असतात. शैक्षणिक सुविधांबाबत तिरंगा परिपूर्ण आहे. अत्याधुनिक संगणक लॅब, सायन्स लॅब, समृद्ध गं्रथालय येथे आहेच; याशिवाय या सुविधांचा विद्यार्थ्यांना पुरेपूर वापर करावा, याकडे कटाक्ष असतो. अ‍ॅबॅकसमध्ये नो चॅलेंजअ‍ॅबॅकस स्पर्धेत या शाळेच्या विद्यार्थ्यांनी आता आपला जागतिक दरारा निर्माण केला आहे. गेल्यावर्षी या शाळेच्या विद्यार्थ्यांनी थायलंड येथे झालेल्या स्पर्धेत नेत्रदीपक यश प्राप्त केले. नुकत्याच चेन्नई येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेतही कामगिरी केली आहे. आता या शाळेचे विद्यार्थी हाँगकाँग दौऱ्यासाठी सज्ज झाले आहेत.